ऑनलाइन लोकमत
कोची, दि. २६ - मूळच्या केरळमधील असणारी एक नर्स व तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली.
२५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास झावैया येथे ही घटना घडली. सुनू सत्यम व प्रणव असे त्या दोघांचे नाव असून एक रॉकेट त्यांच्या घरात घुसून झालेल्या स्फोटात ते मृत्यूमुखी पडले. त्यावेळी सुनू यांचे पती विपिन कुमार कामावर गेले असल्याने ते बचावले.
सुनू सत्यम या झावैया मेडिकल सेंटरमध्ये काम करत होत्या. या हल्ल्यात इतर काही जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आपण याप्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली असून सुनू यांच्या पतीशी संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून नमूद केले.
Two people from Kerala have died in bomb shelling in Libya-Oommen Chandy,Kerala CM pic.twitter.com/PC7sW6MKpf— ANI (@ANI_news) March 26, 2016