शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

दक्षिण चीन समुद्रात चीनने तैनात केले रॉकेट लाँचर्स

By admin | Published: May 17, 2017 3:34 PM

संपूर्ण दक्षिण चीन सागरावर हक्क सांगणा-या चीनने येथील वादग्रस्त भागात रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

बीजिंग, दि. 17 - संपूर्ण दक्षिण चीन सागरावर हक्क सांगणा-या चीनने येथील वादग्रस्त भागात रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत. विएतनामच्या दिशेने हे रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत. मागच्या काही काळापासून चीनने दक्षिण चीन सागरात मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमवी सुरु केली असून, चीनच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेचे बारीक लक्ष आहे. दक्षिण चीन समुद्रात आमच्या ताब्यात जी बेटे आहेत तिथे आम्ही मर्यादीत प्रमाणात लष्करी तळ उभारले असून तिथे लष्करी सिद्धतेची आवश्यकता आहे असे चीनने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे. 
 
अमेरिकेने चीनच्या दक्षिण चीन सागरातील वाढत्या लष्करी हालचालींवर टीका केली आहे. चीनने नॉरीनको सीएस/एआर-1 55 एमएम रॉकेट लाँचर तैनात केले असून, यामध्ये शत्रू नौकांना शोधून हल्ला करण्याची क्षमता आहे. फियरी क्रॉस रीफ बेटावर हे लाँचर्स तैनात केले असून, या भागावर व्हिएतनाम, तैवान आणि फिलीपाईन्स या देशांनीही दावा केला आहे. चीन इथे विमानतळाची उभारणी करत आहे.  
 
अमेरिकेच्या इशा-याला न जुमानता चीन लवकरच दक्षिण चिनी समुद्रातील छोट्या छोट्या बेटावर बांधकाम सुरू करण्याची योजना आखल्या आहेत.  फिलिपिन्सनं या प्रकरणात चीनच्या विरोधात पर्मनन्ट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये खटला भरला आहे. त्यावेळी कोर्टानंही चीनच्या विरोधात निर्णय दिला होता. चीनजवळ असा कोणताही पुरावा नाही, जो दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा मालकी हक्क असल्याचं स्पष्ट करू शकेल. मात्र चीननं हा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला होता. 
 
दक्षिण चिनी समुद्र हा केवळ आंतरराष्ट्रीय व्यापाराचं माध्यम नाही, तर इथे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे. नैसर्गिक साधनांच्या बाबतीत दक्षिण चिनी समुद्र हा खूप समृद्ध आहे. चीननं 2012साली योजनाबद्धरीत्या स्काबरा शोआल क्षेत्रातील काही बेटांवर कब्जा केला होता. अमेरिकेनं या वादग्रस्त क्षेत्रात कोणतंही निर्माण करून नये, असा इशारा आधीच चीनला दिला होता. मात्र चीन अमेरिकेच्या या इशा-याकडे दुर्लक्ष करत दक्षिण चिनी समुद्रात बांधकाम सुरू करण्याच्या विचारात आहे. दक्षिण चिनी समुद्राच्या सुरक्षेखातर चीन इथं प्रशिक्षण केंद्र बनवण्याच्या तयारीत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातूनच चीन इतर देशांवर लक्ष ठेवणार आहे.