न्या पी डॉव, दि. 19- रोहिंग्या मुस्लिमांनी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. म्यानमारमध्येही त्यांनी हल्ले केले आहेत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये आश्रय दिला, पण त्याचा परिणाम काय झाला? आम्ही टीकेला घाबरणारे नाही, असं वक्तव्य म्यानमारच्या स्टेट काऊंसिलर अाँग सान सू की यांनी केलं आहे. देशात बेकायदेशीर राहत असलेल्या काही रोहिंग्या मुस्लिमांकडून देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं. या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेला म्यानमारच्या स्टेट काऊंसिलर आँग सान सू की यांनी उत्तर दिलं आहे. म्यानमारची राजधानी न्या पी डॉव येथे राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेवर आयोजीत सभेत त्यांनी आज भाषण केलं व प्रथनच रोहिंग्यांच्या प्रश्नावर खुलेपणाने मतं व्यक्त केली.
मानवाधिकार उल्लंघनाचा आम्ही निषेध करतो. रोहिंग्या मुस्लिमांनी देशविरोधी कारवाया केल्या आहेत, असंही सू की यांनी म्हंटलं आहे. आमची सुरक्षा दलं कोणत्याही परिस्थितीचा तसंच दहशतवादासारख्या संकटाचा सामना करायला सक्षम आहेत, असं आंग सान सू की यांनी म्हंटलं आहे. रोहिंग्यांनी म्यानमारमध्ये हल्ले केले. जे लोक येथून पलायन करत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातील सामाजिक परिस्थिती खूपच बिकट आहे. या परिस्थितीचा सामना करत आहोत. सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावलं उचलत आहे, असं अाँग सान सू की यांनी म्हंटलं.
आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत असलेल्या टीकेला आम्ही घाबरत नाही. आमचं सरकार फक्त गेल्या १८ महिन्यांपासून सत्तेत आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक पद्धतीचे प्रयत्न करत आहोत. मानवाधिकार उल्लंघनाचा आम्ही निषेध करतो. दहशतवादी कारवायांविरोधात कठोर पावलं उचलण्यात येतील, असंही त्या म्हणाल्या. देशात शांतता प्रस्थापित व्हावी तसंच शांतता टीकावी यासाठी केंद्रीय समितीची स्थापना केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही रोखिन प्रांतात ५ सप्टेंबरपासून कोणतीही जाळपोळ, हिंसा किंवा लष्करी कारवाई झालेली नाही, तरीही बांगलादेशाच्या दिशेने स्थलांतर का होत आहे ते माहिती नाही, असं धक्कादायक विधान म्यानमारच्या स्टेट काऊंसिलर अाँग सान सू की यांनी केलं आहे. राखिन प्रांतात शांततेसाठी आमते सरकार आधीपासून प्रयत्न करत आहे. २०१७-२२ अशी राखिनसाठी पंचवार्षिक योजनाही आम्ही केली आहे. त्यामिळे येथे रोजगार उपलब्ध होईल, शिक्षण आरोग्याच्या सुविधा वाढल्या आहेत. तसेत जेथे फक्क बोटीने जाता येत असे अशा प्रदेशातही रस्ते, वीज व पायाभूत सुविधांची सोय माझ्या सरकारने केल्या आहेत. राखिन प्रांतामध्ये नवे रेडिओ स्टेशन सुरु होणार असून त्यात बंगाली, राखिन व म्यानमारी भाषेत आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं जाईल.