रंगून- म्यानमारमधून बांगलादेशात पळून गेलेल्या लक्षावधी रोहिंग्यांना पुन्हा राखिन प्रांतामध्ये आणण्याच्या योजनेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती म्यानमारचे समाजकल्याण, पुनर्वसन मंत्री डॉ. विन म्यात आये यांनी दिली आहे. म्यानमारची राजधानी न्या पि डॉं येथे म्यानमार सरकार आणि म्यानमार मानवाधिकार आयोगाच्या बैठकीनंतर मंत्री विन यांनी ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यामध्ये 450 हिंदूंना परत म्यानमारमध्ये आणले जाणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जाळपोळ, दंगल, हत्या आणि गुन्ह्यांच्या सत्रामध्ये रोहिंग्याबरोबर हिंदू आणि इतर समुदायांचे लोकही राखिन प्रांत सोडून निघून गेले होते. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार जुलैपासून 6 लाख लोकांनी राखिन प्रांत सोडून पलायन केले आहे. त्यातील बहुतांश लोक रोहिंग्या मुस्लीम होते. रोहिंग्यांच्या प्रत्यावर्तनासाठी बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे.राखिन प्रांताच्या वायव्य भागात ताउंगप्योलेवेइ येथे बांगलादेशातून येणाऱ्या लोकांसाठी छावणी उभी करण्यात आली आहे. रस्ते मार्गाने येणाऱ्या निर्वासितांना तेथे आणण्यात येईल तर न्गाखुया, मंगडौ येथे समुद्र आणि इतर जलमार्गाने येणाऱ्या रोहिंग्यांना आणण्यात येइल.
22 जानेवारीपासून रोहिंग्यांना माघारी पाठवण्याच्या योजनेला होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 12:10 PM
बांगलादेशात पळून गेलेल्या लक्षावधी रोहिंग्यांना पुन्हा राखिन प्रांतामध्ये आणण्याच्या योजनेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती म्यानमारचे समाजकल्याण, पुनर्वसन मंत्री डॉ. विन म्यात आये यांनी दिली आहे.
ठळक मुद्देराखिन प्रांताच्या वायव्य भागात ताउंगप्योलेवेइ येथे बांगलादेशातून येणाऱ्या लोकांसाठी छावणी उभी करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार जुलैपासून 6 लाख लोकांनी राखिन प्रांत सोडून पलायन केले आहे. त्यातील बहुतांश लोक रोहिंग्या मुस्लीम होते.