ढाका- म्यानमारमधील रखाइन प्रांतातील रोहिंग्या लोक गेल्या वर्षी जीव मुठीत घेऊन बांगलादेशाच्या दिशेने पळाले होते. हत्या आणि अत्याचाराच्या सत्राला घाबरून पळालेल्या रोहिंग्यांचे प्रश्न आजही संपलेले नाहीत. युनीसेफने दोन दिवसांपुर्वी दिलेल्या अहवालामध्ये बांगलादेशात असणाऱ्या रोहिंग्यांच्या छावणीमध्ये 9 महिन्यांमध्ये 16 हजार मुलांचा जन्म झाला आहे. या छावणीमध्ये 7 लाख रोहिंग्या राहात आहेत.
म्यानमारमधील नागरिक, तेथील लष्कर आणि रोहिंग्या यांच्यामध्ये झालेल्या तणावात्मक परिस्थितीमुळे रोहिंग्यांना घरेदारे सोडून पळून जावे लागले होते. हे लोक चालत किंवा समुद्रमार्गाने बांगलादेशासह इतर अनेक देशांमध्ये आश्रयासाठी गेले. त्यातील बहुतांश लोक बांगलादेशातील कॉक्स बझार येथे गेले नऊ महिने राहात आहेत.