पोलीस दलाच्या प्रशिक्षणातून एक वर्ष वयाच्या गॅव्हेल नावाच्या कुत्र्याला काढून टाकण्यात आले. कारण काय तर तो पोलिस दलातील सगळ्यांशी फारच मित्रत्वाने वागत होता. हे पिल्लू त्याच्याकडे बघणाऱ्याला दरारा निर्माण करू शकले नाही की दक्ष उभे राहू शकले नाही. परंतु त्याला गडबडा लोळायला आवडायचे व आपले पोट कोणी तरी कुरवाळत बसावे, असे त्याला वाटायचे. या पिल्लाला आॅस्ट्रियातील क्वीन्सलँड पोलीस सेवेत घ्यायचे होते पण ते प्रशिक्षणात अपयशी ठरले. कारण त्याचे वर्तन हे अति मनमिळावू होते. अर्थात प्रशिक्षणातून त्याला काढून टाकले असले तरी त्याच्याकडे नवी जबाबदारीही आली आहे ती म्हणजे ब्रिसबेनचे गव्हर्नर पॉल द जर्सी यांच्या सरकारी निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्यांचे स्वागत करणे. जर्सी यांचा शाही श्वान या नात्याने गॅव्हेल अभ्यागतांचे स्वागत करील. पोलिस दलातील श्वानांना अनेक कौशल्ये शिकवली जातात. परंतु मुळात त्या श्वानांच्या व्यक्तिमत्वातही ते आत्मसात करण्याची सहज प्रवृतीही हवी, असे अधिकारी म्हणाला.
कुत्र्याने गमावली शाही नोकरी
By admin | Published: June 10, 2017 12:30 AM