RRR : एस एस राजामौली (SS Rajamauli) यांच्या आरआरआर (RRR) सिनेमाची चर्चा अजुनही सुरुच आहे. भारतातच नाही तर जगात आरआरआर (RRR) चित्रपटाचं कौतुक होत आहे. सिनेमाने आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. आता तर आरआरआर ने थेट टॉम क्रुझलाही (Tom Cruise) मागे टाकले आहे.
साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि रामचरण (Ramcharan) यांची हिट जोडी आणि राजामौली यांचे दिग्दर्शन असलेल्या आरआरआर सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर जादूच केली आहे.अप्रतिम पटकथा, सिनेमॅटोग्राफी, अभिनय, नृत्य अशा सर्वांगाने परिपूर्ण असलेला हा सिनेमा अनेक पुरस्कार पटकावत आहे. त्यातच भर म्हणजे ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट मधील साईट अॅंड साऊंड मॅगझीनच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत आरआरआरचा समावेश करण्यात आला आहे.
टॉम क्रुझलाही टाकले मागे
ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट मधील साईट अॅंड साऊंड मॅगझीनच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत आरआरआर या सिनेमाने नववे स्थान पटकावले आहे. तर याच यादीत हॉलिवुड स्टार टॉम क्रुझचा 'टॉप गन मेव्हरिक' सिनेमा ३८ व्या स्थानावर आहे. आरआरआरने नववे स्थान पटकावून देशाचे नाव ऊंचावले आहे.
'आरआरआर'ने आजपर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. नुकतेच आरआरआरने जपानमध्येही स्पेशल स्क्रीनिंग ठेवत बक्कळ कमाई केली आहे.पुढील वर्षी हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे.