बँकॉक : कोरोना विषाणूच्या साथीला आळा घालण्यासाठी विविध देशांनी लागू केलेले निर्बंध उठविण्याची घाई केली, तर साथ पुन्हा उलटण्याचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंगळवारी दिला.गेले महिना-दोन महिने लागू असलेले निर्बंध अनेक देशांमध्ये उठविले जाणे किंवा शिथिल केले जाण्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे पॅसिफिक क्षेत्राचे संचालक डॉ. ताकेशी कसाई म्हणाले की, ही वेळ शिथिलतेची नाही. उलट आपल्याला नजीकच्या भविष्यात नव्या पद्धतीने जीवन जगण्याची तयारी करायला हवी. साथ पुन्हा उलटण्याचा धोका असल्याने सरकारांनी दक्ष राहायला हवे. लॉकडाऊन उठविणे आणि सोशल डिस्टन्सिंगची बंधने शिथिल करणे टप्प्याटप्प्याने करायला हवे. हे करत असताना नागरिकांचे आरोग्य व अर्थव्यवहार पुन्हा सुरू करणे यात सुयोग्य संतूलन राखायला हवे. (वृत्तसंस्था)
CoronaVirus: निर्बंध उठवण्याची घाई ठरेल घातक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:27 AM