Russia-America : रशिया आणि अमेरिका, यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. दरम्यान, अलास्का प्रदेशात रशियाच्या कारवाया वाढल्यामुळे अमेरिकेने अलीकडेच या भागात सैन्य तैनात केले आहे. दरम्यान, आता या भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियाचे सुखोई लढाऊ विमान थेट अमेरिकेच्या सीमेत घुसले आणि अमेरिकन जेट F-16 च्या अगदी जवळून उड्डाण केली. यामुळे अमेरिकन जेटला आपला मार्ग बदलावा लागला.
नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ने एक याबाबतचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये रशियन फायटर जेट अमेरिकन एफ-16 च्या अगदी जवळून जाताना दिसत आहे. ही घटना अलास्काजवळ घडली असून, अमेरिकेने यावर तीव्र निषेध व्यक्त केला.
NORAD ने व्हिडिओ जारी करत सांगितले की, गेल्या आठवड्यात अलास्का एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (ADIZ) मध्ये चार रशियन लष्करी विमानांची उपस्थिती जाणवली होती. यानंतर अमेरिकन विमाने रशियन विमानांची शोध घेत असताना ही घटना घडली. अमेरिकन विमाने उड्डाण करत असताना, अचानक वेगवान गतीने रशियाने विमान उडाले. हे रशियन विमान अमेरिकन विमानाच्या अगदी जवळून गेले. छोटी चूक झाली असती, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.