रशियाने युक्रेनवर फोडला महावॉटर बॉम्ब! सर्वात मोठे धरण उडवून दिले; पाण्याचा वेग पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 03:21 PM2023-06-06T15:21:36+5:302023-06-06T15:22:38+5:30
युक्रेनमधील खेरसन भागातील रशियाच्या ताब्यातील नोव्हा काखोव्का धरण रशियन सैन्याने उडवले आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या दक्षिण कमांडने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
गेल्या एक वर्षापासून यक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. अजुनही हे युद्ध सुरुच आहे, आता रशियाने युक्रेनच्या एका धरणावर मोठा हल्ला केला आहेय. रशियन सैन्याने युक्रेनचे सर्वात मोठे धरण उडवले आहे. मंगळवारी पहाटे, दक्षिण युक्रेनमध्ये असलेल्या नोव्हा काखोव्का धरणात स्फोट झाला आणि पाणी पुरस्थिती सारखे परसले आहे. युक्रेनच्या लष्करानेही याला दुजोरा दिला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनीही रशिया धरणात स्फोट घडवण्याचा कट रचत असल्याची भीती व्यक्त केली होती. हे धरण रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या खेरसन प्रदेशाच्या भागात येते. मात्र, रशियाने नियुक्त केलेल्या प्रदेशाच्या महापौरांनी याला 'दहशतवादी कृत्य' म्हटले आहे.
नोव्हा काखोव्का धरण युक्रेनमधील सर्वात मोठ्या नीपर नदीवर बांधले आहे आणि ते खेरसन शहराच्या पूर्वेस 30 किमी अंतरावर आहे. हे धरण फुटणे स्थानिक क्षेत्रासाठी विनाशकारी ठरेल तसेच युक्रेनच्या युद्ध प्रयत्नांवर परिणाम करेल. धरणामुळे पाण्याचा मोठा साठा अडला होता. हे धरण 30 किलोमीटर लांब आणि शेकडो मीटर रुंद आहे. हे 1956 मध्ये काखोव्का जलविद्युत प्रकल्पांतर्गत बांधले गेले. या धरणात सुमारे 18 घन किलोमीटर पाणीसाठा असल्याचे सांगण्यात येते. हे पाणी अमेरिकेतील उटाह येथील ग्रेट सॉल्ट लेकमधील पाण्याइतके आहे.
धरण फुटल्याने खेरसनसह सखल भागात पाणी भरले आहे. 2022 च्या अखेरीस खेरसनचे काही भाग युक्रेनियन सैन्याने ताब्यात घेतले होते. धरणात झालेल्या स्फोटानंतर खेरसन प्रदेशाच्या प्रमुखाने रहिवाशांना बाहेर पडण्यास सांगितले. पाच तासांत पाणी गंभीर पातळीपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी सांगितले. हे धरण दक्षिणेकडील क्रिमियाला पाणी पुरवठा करते, जे 2014 मध्ये रशियाने जोडले होते. याशिवाय झापोरिझ्झ्या न्यूक्लियर प्लांटलाही पाणीपुरवठा केला जातो. हा अणुऊर्जा प्रकल्प युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.
या घटनेनंतर झेलेन्स्की यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'रशियन दहशतवादी. काखोव्का धरणाचा नाश संपूर्ण जगाला याची पुष्टी देतो की त्यांना युक्रेनच्या प्रत्येक कोपऱ्यातून हाकलून दिले जाईल.' प्रत्येक मीटरचा वापर ते दहशतीसाठी करत असल्याने त्यांच्यासाठी एक मीटरही जमीन सोडू नये. धरणाच्या मदतीने काखोव्का हायड्रो पॉवर प्लांटपर्यंत वीज पोहोचते. धरण पूर्ण झाल्यामुळे युक्रेनच्या सततच्या ऊर्जेच्या समस्यांमध्ये भर पडणार आहे. हे क्रिमियासह बहुतेक दक्षिण युक्रेनला पाणीपुरवठा करणारी कालवा प्रणाली देखील नष्ट करू शकते.
Russian terrorists. The destruction of the Kakhovka hydroelectric power plant dam only confirms for the whole world that they must be expelled from every corner of Ukrainian land. Not a single meter should be left to them, because they use every meter for terror. It’s only… pic.twitter.com/ErBog1gRhH
— Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 6, 2023