शहरं
Join us  
Trending Stories
1
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
2
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान; धोनीनेही साक्षीसह हक्क बजावला 
3
अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलीये का?; निवृत्त न्यायमूर्ती चांदिवालांनी सांगितलं रिपोर्टमध्ये काय?
4
निकालापूर्वीच मित्रपक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या ३ जागा धोक्यात; मविआत चाललंय काय?
5
VIDEO: उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; पोलिसांसमोर घडली घटना
6
Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत"; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
7
'भूल भूलैय्या ३'च्या टीमने सिनेमा सुपरहिट झाल्याबद्दल केलं जंगी सेलिब्रेशन, मुख्य कलाकारांची धम्माल! पाहा फोटो
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली; ठाकरे संतापले
9
मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गटात
10
Supriya Sule : "विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय; ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही?"
11
चेन्नईत डॉक्टरवर चाकूहल्ला, रुग्णालयात केले सपासप वार, चार जण अपडेट
12
कार्तिकी पौर्णिमेला ४ शुभ योग: ६ राशींना इच्छापूर्तीचा काळ, धनलाभ संधी; उत्पन्नात वाढ, नफा!
13
शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश
14
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
15
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेटचे लेटेस्ट रेट
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...
17
रॅपर बादशाहला डेट करतेय पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर, लग्नाबद्दल म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
19
दुर्मिळातली दुर्मिळ...! पुण्याच्या महिलेने अख्खा टूथ ब्रश गिळला; ऐकून डॉक्टरही शॉक झाले
20
कुणाचं घर तुटता कामा नये, कायद्याचं पालन गरजेचं! बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 

रशिया करू शकेल अमेरिकेलाही लक्ष्य!

By admin | Published: October 27, 2016 2:39 AM

अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील लक्ष्यांचा थेट वेध घेऊ शकेल असे ‘आरएस-२८ सरमत’ नावाचे नवे आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र रशिया विकसित

मॉस्को : अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील लक्ष्यांचा थेट वेध घेऊ शकेल असे ‘आरएस-२८ सरमत’ नावाचे नवे आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र रशिया विकसित करीत असून सन २०१८ च्या अखेरपर्यंत ते रशियन सैन्यदलांच्या सेवेत दाखल होईल.शीतयुद्धाच्या काळातील जुनी आण्विक क्षेपणास्त्रे मोडित काढून नवी अधिक भेदक क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. रशियाकडील सध्याचे अशा प्रकारचे आण्विक क्षेपणास्त्र त्याच्या संहारक शक्तिमुळे ‘सतान’ (सैतान) या नावाने ओळखले जाते. त्यामुळे आणखी प्रगत आवृत्तीस ‘सतान-२’ म्हटले जात आहे.हिरोशिमा व नागासाकीवर सन १९४५ मध्ये टाकले त्याच्या दोन हजार पट अधिक संहारक शक्ती असलेले अणूबॉम्ब वाहून नेण्याची ‘आरएस-२८ सरमत’ ची क्षमता असेल. शत्रुच्या रडार यंत्रणेला पूर्णपणे चकवा देत ते १० किमी अंतरावर असलेल्या लक्ष्याचाही वेध घेऊ शकेल.‘गिझोमोदो’’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र एका वेळी १६ अणुबॉम्ब वाहून नेऊ शकेल व त्याचा कमाल वेग सेकंदाला ७ किमीपर्यंत पोहोचू शकेल. ही क्षमता आणि पल्ला लक्षात घेता अमेरिकेच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील लक्ष्यांखेरीज पॅरिस व लंडनसारखी युरोपीय शहरेही या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात येऊ शकतील. शीतयुद्धाच्या काळात तैनात केलेल्या मूळ ‘सतान’ अण्वस्त्रांचा सेवाकाळ संपत आल्याने त्यांची जागा घेणारी नवी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आपण विकसित करणार असल्याचे रशियाने सन २०१३ मध्ये जाहीर केले होते. रशियन सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, नवी ‘सतान-२’ आण्विक क्षेपणास्त्रे सन २०१८ च्या अखेरीस सैन्यदलांच्या सेवेत रुजू व्हायला सुरुवात होईल. (वृत्तसंस्था)‘सैतान-२’ची वैशिष्ट्येएका वेळी 16 अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमताशत्रुच्या रडारच्या पडद्यावर अजिबात दिसणार नाही.या अणुबॉम्बची संहारक क्षमता हिरोशिमा व नाकासाकी बेचिराख करणाऱ्या अणुबॉम्बच्या 2000 पट आहे.10000  किमी. मारक पल्ला आणि कमाल वेग ७ किमी प्रति सेकंद.