चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात जगातील १ कोटी ९० लाखाहून अधिक लोक सापडले आहेत. आतापर्यंत साडेसात लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक संशोधक रात्रंदिवस मेहनत करुन कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र जगातील अनेक देशांना मागे टाकत रशियाने कोरोनावरील पहिली लस बनवली आहे, अशाप्रकारे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन(Russian President Vladimir Putin) यांनी घोषणा केली आहे. रशियाने कोरोनावरील यशस्वी लस तयार केली आहे. परंतु या लसीकडे जगभरातील अनेक संशयाच्या नजरेने बघत आहेत. या लसीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रशियन लसीवर प्रश्न उपस्थित करण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील काही प्रमुख कारणं जाणून घेऊया.(Russia corona vaccine)
१) रशियन लसीवर शंका घेण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे या लसीविषयीची माहिती सार्वजनिक केली नव्हती जितकी यूके किंवा अमेरिकन लसीबाबत माहिती सार्वजनिक केली गेली, म्हणजेच, चाचण्या कधी आणि किती काळ सुरू होत्या? किती लोकांचा चाचणीत समावेश होता? लसीचे दुष्परिणाम काय आहेत? ही लस वापरल्यानंतर किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि किती जणा आजारातून बरे झाले.
२) लसीच्या प्रभावाची तपासणी हजारो लोकांवर बराच काळ केली जाते तेव्हा कोणत्याही लसीसाठी तिसर्या टप्प्यातील चाचणी (अंतिम चाचणी) खूप महत्वाची असते. परंतु रशियाच्या कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
रशियन लसीची सुरुवातीची चाचणी माकडावर आणि नंतर मानवांवर झाली. या चाचण्यांमध्ये रशियाला यश मिळाल्याची माहिती आहे. परंतु लस उत्पादक संस्था गमलेया इन्स्टिट्यूटने या लसीची मोठ्या प्रमाणात नियंत्रित चाचणी घेतली नाही, जेणेकरून या लसीची सुरक्षा आणि धोक्याची तपासणी करता येईल.
३) न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, रशिया राजकारणाच्या किंवा प्रचाराच्या उद्देशाने घाईत लसीच्या यशाची घोषणा करीत असल्याची चिंता जगाला वाटत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील गेल्या आठवड्यात इशारा दिला आहे की पारंपारिक चाचणी करण्याच्या पद्धती सोडून रशियाने लस तयार करू नये.
दरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं म्हणणं आहे की, ही लस स्थिर मार्गाने प्रतिकारशक्ती विकसित करते आणि ती देखील पुरेशी प्रभावी आहे. मी पुन्हा सांगतो, ही लस सर्व आवश्यक तपासांतून गेली आहे असा दावा त्यांनी केला आहे.
४) त्याच वेळी, डब्ल्यूएचओने जगभरातील सर्व लसींची यादी तयार केली आहे, ज्यांच्या चाचण्या चालू आहेत. परंतु अद्याप या यादीमध्ये रशियाच्या लसीचा समावेश नाही.
५) गेल्या आठवड्यात रशियातील आरोग्य मंत्रालयाला लसीच्या मानवी चाचण्या आणि कोणत्याही संभाव्य दुष्परिणाम आणि संशोधनासंबंधी तपशीलवार प्रश्न पाठविले गेले होते, परंतु मंत्रालयाने त्यास प्रतिसाद दिला नाही असं न्यूयॉर्क टाईम्समध्ये म्हटलं आहे.
६) यापूर्वी अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन सरकारने असा आरोप केला आहे की, रशियन सरकारशी संबंधित हॅकर्स लस संशोधनाविषयी माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे रशियन लसीवर जगाचा संशय वाढला. पण रशियन अधिकाऱ्यांनी लस संशोधन माहिती हॅक केल्याचा आरोप फेटाळून लावला.(Russia corona vaccine)
अन्य महत्त्वाच्या बातम्या
जगातील पहिली कोरोना लस रशियाकडून लॉन्च; कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार? जाणून घ्या
जगातील पहिली कोरोना लस बनवली; रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची घोषणा
पोलीस उपनिरीक्षकानं लॉकडाऊनमध्ये लग्न केलं अन् होम क्वारंटाईनमध्ये स्वत:वर गोळी झाडली
१ सप्टेंबरपासून शाळा सुरु होण्याची शक्यता धूसर; कोरोनाच्या धास्तीनं ऑनलाईन शिक्षणावरच भर
सीबीआय चौकशी करायची असेल तर गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांचीही करा; शिवसेनेची मागणी