Russia Ukraine War: आर्थिक निर्बंध असूनही रशियानं भरला सरकारी खजिना; चीन-भारताचं मोठं योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 06:06 PM2022-06-13T18:06:53+5:302022-06-13T18:07:47+5:30

रिपोर्टप्रमाणे, युद्धाच्या पहिल्या १०० दिवसांत यूरोपीय संघाने रशियाकडून जीवाश्म इंधन निर्यातीच्या ६१ टक्के खरेदी केले.

Russia Earns $98 Billion From Fuel Exports In 100 Days Of War: Report | Russia Ukraine War: आर्थिक निर्बंध असूनही रशियानं भरला सरकारी खजिना; चीन-भारताचं मोठं योगदान

Russia Ukraine War: आर्थिक निर्बंध असूनही रशियानं भरला सरकारी खजिना; चीन-भारताचं मोठं योगदान

googlenewsNext

रशिया-यूक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात होऊन आता १०० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु अद्यापही हे युद्ध शमण्याचं चिन्ह नाही. परंतु या युद्ध काळात रशियानं ऑयल विक्री करून तगडी कमाई केली आहे. यूक्रेनविरोधात चाललेल्या युद्धाच्या १०० दिवसांच्या कालावधीत रशियानं जीवाश्म इंधन (Fossil fuel) निर्यात करून ९८ बिलियन डॉलर कमावले आहेत. यूरोपियन संघाने सर्वात जास्त आयात केले आहे. पाश्चिमात्य देशांनी यूक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले. तरीही इंधन निर्यातीतून रशियानं खजिना भरला. 

फिनलँड स्थित सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी एन्ड क्लीन एअर(CREA) रिपोर्टनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला यूरोपीय संघ बहुतांश प्रमाणात रशियाकडून तेल निर्यात रोखण्यासाठी सहमत झाला होता. परंतु यूरोपीय यूनियन संघ इंधनासाठी रशियावर सर्वाधिक निर्भर आहे. मात्र २०२२ मध्ये रशियाकडून गॅस निर्यात दोन तृतियांश कमी करण्याचं लक्ष्य ठेवले आहे. रिपोर्टप्रमाणे, युद्धाच्या पहिल्या १०० दिवसांत यूरोपीय संघाने रशियाकडून जीवाश्म इंधन निर्यातीच्या ६१ टक्के खरेदी केले. त्याची किंमत जवळपास ६० बिलियन डॉलर आहे. 

चीननेही केले आयात
यूरोपीय संघानंतर चीननं रशियाकडून सर्वाधिक जीवाश्म इंधन खरेदी केले. चीनने १२.६ बिलियन यूरो, जर्मनी १२.१ बिलियन यूरो, इटली ७.८ बिलियन यूरो रशियाकडून इंधन खरेदी केले. रशिया जीवाश्म इंधनातून पूर्वी ४६ बिलियन यूरो कमाई करत होता. त्यानंतर गॅस पाइपलाइन, तेल उत्पादन, एलएनजी आणि कोळसा निर्यात करून कमाई करत होता. मे महिन्यात रशियाच्या निर्यातीत घट झाली. अनेक कंपन्यांनी रशियातून निर्यात बंदी केली. परंतु चीन, भारत, यूएई आणि फ्रान्ससारख्या देशांनी रशियाकडून खरेदी वाढवली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के अधिक निर्यात झाली. 

युरोपनेही सर्वाधिक कच्च्या तेलाची खरेदी केली
युक्रेनसोबतच्या युद्धानंतर रशियाने कच्च्या तेलावर सूट देण्याची घोषणा केली. याचा सर्वाधिक फायदा युरोपीय देशांना झाला आहे. जागतिक बेंचमार्कपेक्षा ३० टक्के कमी दराने कच्च्या तेलाची विक्री करणार असल्याचे रशियाने म्हटले होते. युरोपियन युनियनला २७ टक्के तेल रशियाकडून मिळते. युद्ध आणि निर्बंध असूनही, युरोप रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार बनला. 

Web Title: Russia Earns $98 Billion From Fuel Exports In 100 Days Of War: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.