रशियाने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये पहिल्यांदाच वीज खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 05:57 AM2022-10-27T05:57:13+5:302022-10-27T05:57:25+5:30
नियंत्रण कक्षात बसून पुतीन पाहणी करीत असल्याचे दूरचित्रवाहिनीवर दाखवण्यात आले.
मॉस्को : युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रयुद्धाच्या संशयाचे धुके दाटलेले असतानाच रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. क्रेमलीनमधील सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र युद्धाचा मुकाबला करणाऱ्या मॉस्कोतील धोरणात्मक दलांची पाहणी केली. टीयू ९५ या दूर पल्ल्याच्या विमानांच्या ताफ्याचाही यात समावेश असल्याचे म्हटले आहे. नियंत्रण कक्षात बसून पुतीन पाहणी करीत असल्याचे दूरचित्रवाहिनीवर दाखवण्यात आले.
रशियातील हवाई हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये पहिल्यांदाच वीज खंडित झाली आहे. तर पाणीपुरवठ्यातही कपात करण्यात आली. भारताचे संरक्षणमंत्री यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्याशी फोनवर चर्चा केली. रशिया युक्रेन युद्धा अण्वस्त्रांचा वापर केला जाउ नये असा आग्रह राष्ट्रीय त्यांनी केला. चर्चेद्वारे लवकर युद्धविराम व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला ही गंभीर चूक ठरेल असा इशारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली आहे. दुसऱ्या बाजूला या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने भारतीय नागरिकांना ताबडतोब यूक्रेन सोडण्याच्या सूचना केल्या आहेत.