मॉस्को -रशियामध्ये कोरोना लसीचे परीक्षण तुर्तास थांबवण्यात आले आहे. लसीची अधिक मागणी आणि डोसची कमतरता, यांमुळे नव्या स्वयंसेवकांवरील कोरोना लसीचे परीक्षण अचानकपणे थांबवण्यात आले आहे. यासंदर्भात अभ्यास करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीने गुरुवारी सांगितले, की मॉस्कोच्या महत्वाकांक्षी कोरोना लसीची योजना अचानक पणे थांबवणे एक धक्का आहे.
रशियन कोरोना लस स्पुतनिक व्हीचे (Sputnik V) 85 टक्के लोकांवर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आले नाही. ही लस तयार करणाऱ्या गामलेया रिसर्च सेंटरचे प्रमूख अलेक्झँडर गिंट्सबर्ग यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. अलेक्झँडर म्हणाले, की 15 टक्के लोकांवर या लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत.' Sputnik V लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू आहे.
पुढील वर्षात भारतात होणार रशियन लसीचे परीक्षण - रशियन लसीचे भारतातील परीक्षण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. या लसीचे भारतात परीक्षण करत असलेली हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीने म्हटले आहे, रशियन लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील मानवी परीक्षण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. डॉ. रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी ईरेज इस्रारायल म्हणाले, 'स्पुतनिक-व्ही लसीच्या मिडल स्टेजच्या परीक्षणासाठी पुढील काही आठवड्यात रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल. आणि डिसेंबरपर्यंत हे परीक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे.
भारत फार्मा कंपनी सोबत करार -रशियाने आपल्या स्पुतनिक-व्ही लसीच्या फेज थ्रीच्या परीक्षणासाठी भारतीय फार्मा कंपनी डॉक्टर रेड्डी लॅब्ससोबत करार केला आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)नेही परवानगी दिली आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)नेही यासाठी परवानगी दिली आहे. आता देशातील एकूण 12 सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये एकाच वेळी लसीचे परीक्षण सुरू होईल. यात जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजसह पाच सरकारी तर सहा खासगी संस्थांचा समावेश आहे.