Russia Ukraine War: रशियाने २४ तासांत घेतला युद्धनौका उडविल्याचा बदला! नेप्च्यून मिसाईलचा प्लांटच उद्ध्वस्त केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:54 PM2022-04-15T19:54:03+5:302022-04-15T19:54:16+5:30

Russia takes revenge Moskva Warship Sinks: युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी रशियाला तगडा झटका बसला आहे. काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवाचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Russia hits Kyiv missile plant of Neptune anti-ship cruise missile after losing iconic warship Moskva In Black Sea | Russia Ukraine War: रशियाने २४ तासांत घेतला युद्धनौका उडविल्याचा बदला! नेप्च्यून मिसाईलचा प्लांटच उद्ध्वस्त केला

Russia Ukraine War: रशियाने २४ तासांत घेतला युद्धनौका उडविल्याचा बदला! नेप्च्यून मिसाईलचा प्लांटच उद्ध्वस्त केला

Next

युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी रशियाला मॉस्कोपर्यंत हादरे बसतील अशी व्यवस्था आज युक्रेनी सैन्याने केले होते. रशियाची सर्वात बलाढ्य अशी युद्धनौका नेप्च्यून मिसाईल डागून उद्ध्वस्त केली होती. यामुळे तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात म्हणत रशियाने २४तासांतच याचा बदला घेतला आहे. 

युक्रेनने मोस्कवा युद्धनौका ज्या मिसाईलने बुडविली ती मिसाईल बनणाऱ्या सैन्याच्या कारखान्यालाच रशियाने टार्गेट केले आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर जोरदार हल्ला केला आहे. यामध्ये नेप्च्यून मिसाईलची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. 

युक्रेनने भविष्यात पुन्हा असे हल्ले करू नये यासाठी रशियन फौजांनी युक्रेनची मोठी ताकदच उध्वस्त करण्याचे पाऊल उचलले आहे. युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी रशियाला तगडा झटका बसला आहे. काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवाचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्धनौकेतील स्फोटकांना आग लागल्याने ही घटना घडल्याचे म्हटले होते.

युक्रेनच्या दाव्यानुसार नेप्च्यून क्रूझ मिसाईल आणि तुर्कीच्या बायरकतार टीबी-2 ड्रोनच्या मदतीने या अजस्त्र युद्धनौकेला उद्ध्वस्त केले. दुसऱ्या महायुद्धावेळी १९४१ नंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाने रशियासारख्या शत्रूची युद्धानौका उडविली आहे. या युद्धनौकेने एकेकाळी व्लादिमीर पुतीन यांचीदेखील सुरक्षा केली होती. या मोस्कवा युद्धनौकेच्या कहान्या खूप रंजक आहेत. ती 12500 टन वजनाची होती. तर ६०० फूट लांबीची. सोव्हिएत संघापासून नौदलाची शान असलेल्या युद्धनौकेवर हल्ला झाल्याने हा युक्रेनचा मानसिकदृष्ट्या विजय असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Russia hits Kyiv missile plant of Neptune anti-ship cruise missile after losing iconic warship Moskva In Black Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.