गेल्या काही दशकांपासून कितीही नुकसान झाले तरी रशियाने भारताची वेळोवेळी मदत केली होती. प्रसंगी भारतावर हल्ला करण्यासाठी येत असलेल्या अमेरिकी नौदलाच्या पाठीमागे आपल्या युद्धनौका, पाणबुड्या लावल्या होत्या. आज आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे परिस्थीत बदलत चालली आहे. रशियाविरोधात लढण्यासाठी रणगाडे आणि शस्त्रास्त्रे युक्रेनला पाठविणाऱ्या पाकिस्तानला रशियाने स्वस्तातील कच्चे तेल पाठविले आहे.
रशियाच्या कच्च्या तेलाची पहिली फेरी कराची बंदरावर पोहोचली आहे. पाकिस्तान भिकेला लागला आहे, आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चे तेल खरेदी करण्याचे त्यांच्याकडे पैसे नाहीत. असे असताना रशियाने ही मदत सुरु केली आहे. भारतासाठी धक्कादायक बाब म्हणजे चीनच्या सांगण्यावरून रशियाने कच्चे तेल देण्यास सुरुवात केली आहे.
रशिया चीन आणि पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी भारताला गेल्या कित्येक वर्षांपासून शस्त्रास्त्रे आणि लढाऊ विमाने, रणगाडे, क्षेपणास्त्रे पुरवत आहे. दुसरीकडे युक्रेन पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी रणागाडे देत आला होता. चीनही पाकिस्तानला भारतविरोधी कारवायांसाठी मदत करत असतो. अमेरिकाही मदत करत असतो. यामुळे आता भारताचा खरा असा मित्र कोणीच राहिलेला नाहीय. तर रशिया देखील आता संधीसाधू बनत चालला आहे. कारण रशियाला अमेरिका, युरोप विरोधात चीनची मदत हवी आहे.
आताच्या परिस्थितीत दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ४५ हजार मेट्रिक टन कच्चे तेल ते देखील स्वस्त दरात मिळणे म्हणजे लॉटरीत लागलेली आहे. जर सर्व काही सुरळीत झाले तर पाकिस्तान रशियाकडून दररोज एक लाख बॅरल तेल खरेदी करू शकेल. रशियाकडून स्वस्तात तेल मिळाल्याने पाकिस्तानातील सर्वसामान्य ग्राहकांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.