शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; दोन बॅलेस्टिक मिसाईल डागली, ४१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 6:14 PM

Russia Ballistic Missiles attack on Ukraine: रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १८० जण जखमी झाल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले

Russia Launches 2 Ballistic Missiles in Ukraine Poltava 41 Killed 180 Injured: रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. रशियाने मंगळवारी युक्रेनवर बॅलेस्टिक मिसाईल (Russia Missile Attack) हल्ला केला. दोन रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील पोल्टावा शहराला लक्ष्य केले. या हल्ल्यात ४१ लोकांचा मृत्यू झाला असून १८० जण जखमी झाले आहेत. रशियन क्षेपणास्त्रांनी लष्करी शैक्षणिक संस्थेला लक्ष्य केल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिली.

झेलेन्स्की यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, "मला पोल्टावामध्ये झालेल्या रशियन हल्ल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यांनी एका शैक्षणिक संस्थेला आणि जवळच्या हॉस्पिटलला लक्ष्य केले आहे. टेलिकम्युनिकेशन इन्स्टिट्यूटची इमारतदेखील अंशतः नष्ट झाली आहे."

झेलेन्स्की यांनी शोक व्यक्त केला

झेलेन्स्की यांनी असेही सांगितले की, लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी अनेकांना वाचवण्यात यश आले आहे, परंतु १८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुर्दैवाने, यात अनेकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ४१ लोक या मृत्युमुखी पडले आहेत. त्या सर्वांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. माझ्या सहवेदना त्यांच्या नातेवाईकांसोबत आणि प्रियजनांसोबत आहेत.

देशाच्या मध्य भागात रशियाने हा हल्ला केला आहे. युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्याच्या दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन मंगळवारी मंगोलियात आले होते. तेथे खरे पाहता त्यांच्या अटकेसाठी आंतरराष्ट्रीय वॉरंट जारी असतानाही त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या आक्रमणादरम्यान केलेल्या कथित युद्ध गुन्ह्यांमुळे पुतिन यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय वॉरंट जारी करण्यात आले होते. हेग-आधारित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) सुमारे १८ महिन्यांपूर्वी अटक वॉरंट जारी केले होते. तरीही आज त्यांचे स्वागत झाल्याने जागतिक स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध