Russia Luna-25 Moon Mission: गेल्या महिन्यात भारताने चंद्रयान-3 लॉन्च केले. यशस्वी लॉन्चिंगनंतर आता चंद्रावर लँड करण्याची सर्वजण प्रतिक्षा करत आहेत. या दरम्यान, रशियासाठी आज धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियाने 50 वर्षांनंतर दुसऱ्यांदा चंद्र मोहीम सुरू केली होती, 21 ऑगस्ट रोजी रशियाचे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. पण, आता रशियाचे यान कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियाने त्यांचे यान पाठवले होते. विशेष म्हणजे, चंद्रयानापूर्वी हे यान चंद्रावर उतरणार होते. पण, आता हे यान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. रशियाची अंतराळ संस्था Roscosmos ने सांगितले की, त्यांचा Luna-25 यानाशी संपर्क तुटला आहे. याचा अर्थ यानाचे चंद्रावर क्रॅश लँडिंग झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 11 ऑगस्ट रोजी रशियाने त्यांचे Luna-25 लॉन्च केले होते.
दरम्यान, भारतासाठीही येणारे तीन दिवस फार महत्वाचे आहेत. ISRO ने गेल्या महिन्यात 14 जुलै रोजी त्यांचा महत्वकांशी प्रकल्प चंद्रयान-3 लॉन्च केला होता. आज इस्रोने सांगितले की, येत्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशियाचे यान कोसळल्यानंतर आता संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या चंद्रयान-3 वर आहेत.