शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 1:25 PM

Lunar Nuclear Power Plant : भारताने 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे हा प्लांट भारतासाठी फार महत्वाचा आहे.

Lunar Nuclear Power Plant : रशियाने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी भारतरशियासोबत हातमिळवणी करणार आहे. रशियाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात भारताने उत्सुकता दाखवली आहे. या रशियन प्रकल्पाचा उद्देश चंद्रावर तयार होत असलेल्या बेसला ऊर्जा पुरवठा करणे हा आहे. दरम्यान, चीनही या प्रकल्पात सामील होणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील सरकारी अणुउर्जा संस्था रोसाटॉम या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहे. चंद्रावर बांधण्यात येणारा हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प अर्धा मेगावॅट वीज निर्मिती करेल आणि ही वीज चंद्रावर बांधलेल्या बेससाठी वापरली जाईल.

हा प्लांट 2036 पर्यंत तयार होणाररशियाची सरकारी न्यूज एजन्सी TASS नुसार, Rosatom चे प्रमुख Alexey Likhachev म्हणाले की, चीन आणि भारताने या प्रकल्पात खूप रस दाखवला आहे. तर, रशियाच्या अंतराळ संस्थेने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असल्याचे जाहीर केले आहे. 2036 पर्यंत हा प्लांट तयार होण्याची अपेक्षा आहे.

भारतासाठी हा प्लांट महत्वाचा रशियाचा चंद्रावर उभारला जाणारा पहिला अणु प्रकल्प भारतासाठी खास आहे. 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची भारताची योजना आहे. अशा परिस्थितीत हा प्लांट तेथील ऊर्जेची गरज भागवू शकतो. 2021 मध्ये रशिया आणि चीनने संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र बांधण्याची घोषणा केली होती. हे स्टेशन 2035 ते 2045 दरम्यान कधीही सुरू होऊ शकते. या स्थानकाचा उद्देश वैज्ञानिक संशोधन करणे हा आहे. बहुतांश देश याचा वापर करू शकतील. त्याचा फायदा अमेरिकेच्या काही मित्र राष्ट्रांना मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :russiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतchinaचीनisroइस्रो