जगभरात दररोज लाखो गुन्हे घडतात. यातील काही गुन्हे असे असतात ज्यांबाबत वाचल्यावर अंगावर काटे येतात. रशियातून (Russia) अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला हत्या आणि मनुष्याचं मांस खाण्याच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही व्यक्ती लोकांची हत्या करून त्यांचं मांस दारूसोबत चखना म्हणून खात होता.
रशियातील ही धक्कादायक घटना गज सेलमधील आहे. इथे राहणाऱ्या ३२ वर्षीय ब्लादिमीरल ३ लोकांच्या हत्येचा दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही व्यक्ती लोकांना वेदनादायी मृत्यू तर देतच होता, सोबतच त्यांचं कच्च मांस वोडकासोबत चखना म्हणून खात होता. गज सेलची लोकसंख्या जास्त नाही. इथे एकूण १७२१ लोकच राहतात.
लोकल मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्लादिमीरने यावर्षी मार्च महिन्यात एका महिला आणि तिच्या मित्रासोबत वाद झाल्यावर दोघांचीही हत्या केली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली. त्यातील एक म्हणजे मनुष्याचं मांस खाणं ही एक. सुनावणी दरम्यान क्राइम ब्रॅंच हेड इन नोसेवा म्हणाले की, ब्लादिमीरने चौकशीवेळी सांगितलं होतं की, या दोघांच्या हत्येनंतर मनाला त्यांचं मांस खाण्याची इच्छा झाली होती. त्यानंतर त्याने वोडका खरेदी केली आणि त्यासोबत चखना म्हणून त्यांचं मांसही खाल्लं होतं.
ब्लादिमीरने ज्या दोन लोकांची हत्या केली होती. त्यांच्यासोबत त्याचं काही देणंघेणं नव्हतं. सोबतच ते हत्यारही सापडलं नाही जे त्याने त्यांची हत्या करण्यासाठी वापरलं होतं. ब्लादिमीरने चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याने या दोघांचं मांस खाल्लं. त्यासोबत तो वोडकाही प्यायला. धक्कादायक बाब म्हणजे त्याने मांस शिजवलंही नव्हतं. ते त्याने कच्च खाल्लं.
रिपोर्ट्सनुसार, लोकल पोलिसांना जेव्हा या व्यक्तीबाबत माहिती मिळाली तेव्हा चौकशी दरम्यान त्यांना ब्लादिमीर हत्येच्या आणखी एका केसमध्ये सहभागी असल्याचं समजलं. कठोरपणे चौकशी केल्यावर ब्लादिमीरने लगेच सगळे गुन्हे मान्य केले.