रशियात एक मिलिट्री मालवाहक विमान हवेतच पेटल्याची धक्कादायक (Russia Plane Crash) घटना समोर आली आहे. हे विमान मॉस्कोजवळ (Moscow) क्रॅश झालं. या घटनेनंतर विमान काही सेकंदातच आगीच्या भक्षस्थानी होतं. रशियन मिलिट्री विमान क्रॅश होताच मोठा धमाका झाला आणि धुराचे लोळच लोळ दिसू लागले होते. या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यात विमानाला हवेतच आग लागल्याचं दिसत आहे.
रॉयटर्सनुसार, या विमानाचे निर्माता यूनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने सांगितलं की, मंगळवारी मॉस्को भागात एका टेस्ट उड्डाणादरम्यान एका प्रोटोटाइप Ilyushin Il-112V सैन्य विमानाचा अपघात झाला. यावेळी यात तीन लोक होते. कंपनीकडून हे स्पष्ट करण्यात आलं नाही की, यात कुणी जीव गमावला की नाही. मात्र, आरआयए न्यूज एजन्सीने एका अज्ञात स्त्रोताच्या हवाल्याने वृत दिलं की, असं मानलं जात आहे की, चालक दलाचा मृत्यू झाला.
दुर्घटनेच्या या व्हिडीओ एक विमान कमी उंचीवर उडताना दिसत आहे. ज्याच्या एका पंखाला आग लागली. काही वेळाने हे विमान जमिनीवर कोसळतं. दरम्यान याआधीही एक रशियन विमान तुर्कीतत दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ज्यात चालक दलासहीत एकूण ८ लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यात पाच रशियन आणि ३ तुर्कीच्या नागरीकांचा समावेश होता.