शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

रशिया युक्रेनचा खेरासन प्रांत बुडविण्याच्य़ा तयारीत; डॅममध्ये लँडमाईन्स पेरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 11:23 AM

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष  जेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने आखलेला धक्कादायक प्लॅन सांगितला आहे. खेरासनमध्ये तातडीने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाठविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज आठ महिने होत आले तरी युक्रेन अवघ्या अडीज लाख सैनिकांच्या आणि नागरिकांच्या जोरावर बलाढ्या रशियन फौजांशी लढत आहे. दोन्ही बाजुंनी प्रचंड नुकसान झाले आहे. अब्जावधी डॉलरचा खर्च झाला आहे. तरीही युक्रेन नमत नसल्याने पुतीन सेनेने आता युक्रेनमध्ये कहर मांडण्याचे ठरविले आहे. 

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष  जेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने आखलेला धक्कादायक प्लॅन सांगितला आहे. खेरासनमध्ये तातडीने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाठविण्याची मागणी त्यांनी केली आहे. दक्षिणी युक्रेनच्या खेरासन भागात एका मोठ्या डॅममध्ये रशियने सैन्याने बॉम्ब पेरले आहेत. Kakhovka Hydroelectric Power Plant असे या डॅमचे नाव असून तो सध्या रशियन फौजांच्या ताब्यात आहे. 

या डॅमचा वापर युक्रेनमध्ये वीज तयार करण्यासाठी केला जातो. हा डॅम Dnieper River वर बनविण्यात आला आहे. या डॅमचे पाणी नॉर्थ क्रीमिया नदीला जाऊन मिळते. हे धरण दक्षिण युक्रेनच्या नागरी भागांना पाणीपुरवठा करते. स्फोट झाला तर सर्व पाणी वाहून जाईल आणि दक्षिण युक्रेनमध्ये पाणीपुरवठा देखील ठप्प होईल.

युक्रेनच्या आरोपांनुसार हा डॅम केवळ वीज निर्मितीसाठीच महत्वाचा नाहीय, तर रशियाच्या रणनितीसाठी देखील महत्वाचा आहे. हा डॅम फोडला तर त्याचे पाणी खेरासनमध्ये घुसून प्रचंड विध्वंस करू शकते. यामुळे रशियाच्या सैन्याने या डॅमला स्फोटके लावली आहेत. याचे पाणी शहरे, गावांत घुसून पूराची स्थिती निर्माण होईल. जवळपास ८० टक्के भाग पाण्याखाली जाईल, असा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे. धरण फोडले तर सर्वात मोठे आव्हान अणुऊर्जा प्रकल्प थंड करण्याचे असेल. अशा परिस्थितीत झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये थंड होण्यासाठी पाणी शिल्लक राहणार नाही, असा इशाराही झेलेन्स्की यांनी दिला आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया