रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 05:33 AM2024-05-07T05:33:58+5:302024-05-07T05:34:13+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पाचव्या कार्यकाळाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी तसेच दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या विजय दिवसापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे.
मॉक्सो : पश्चिमी देशांनी युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत रशियाविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर रशिया अधिक आक्रमक झाला असून, त्यांनी अण्वस्त्रांसह लष्करी सरावाची योजना आखली आहे. त्यामुळे जगभरात तणाव आणखी वाढला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पाचव्या कार्यकाळाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी तसेच दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या विजय दिवसापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. अण्वस्त्रांसह लष्करी सराव हा रशियाबाबत काही पाश्चात्य देशांच्या अधिकाऱ्यांकडून प्रक्षोभक विधाने आणि धमक्यांना दिलेले उत्तर आहे, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटले आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले. तर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड कॅमेरॉन यांनी सांगितले की किव्हचे सैन्य रशियाच्या आत लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी ब्रिटनची शस्त्रे वापरू शकतात. त्यानंतर रशियाने ही नवीन चाल खेळली आहे.
तब्बल १ लाख लोकांना हाकलणार, युद्ध वाढणार
रफाह : इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना दक्षिण गाझा शहर रफाह रिकामे करण्यास सांगितले आहे. यामुळे तेथे लवकरच जमिनीवरून हल्ला होण्याचे संकेत मिळत आहेत.
इस्रायली सैन्याच्या घोषणेने युद्धविरामासाठी मध्यस्थीचे प्रयत्न अवघड झाले आहेत. इस्रायलने सात महिन्यांच्या युद्धानंतर रफाहला हमासचा शेवटचा महत्त्वाचा गड असे म्हटले आहे.
लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी म्हटले की, १ लाख लोकांना रफाहमधून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.