शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 5:25 PM

रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची हत्या करण्यात आली.

रशियन शास्त्रज्ञाचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली. गुरुवारी (2 मार्च) त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. बोटीकोव हे रशियातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते आणि त्यांना लसीवरील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कारही मिळाला होता. अहवालानुसार, 2020 मध्ये स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटीकोव एक होते.

रशियन वृत्तसंस्थेने TASS ने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, 47 वर्षीय बोटीकोव, गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते, गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोविड लसीवरील कार्याबद्दल 2021 मध्ये वायरोलॉजिस्टला 'ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड' पुरस्काराने सन्मानित केले.

बेल्टने दाबला गळा 

रशियन शास्त्रज्ञ बोटीकोव यांच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 29 वर्षीय तरुणाने किरकोळ वादात बोटीकोवचा बेल्टने गळा दाबून खून केला आणि तो पळून गेला. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांनी याला देशांतर्गत गुन्हा म्हटले आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, बोटीकोवचा मृतदेह सापडल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.

आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन शास्त्रज्ञाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात खटला भरण्यात आला असून तो अनेक वर्षांपासून तुरुंगात होता. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसrussiaरशिया