Russia Ukrain War: KFCनंतर आता McDonalds कंपनीनेही घेतला मोठा निर्णय; रशियातील ८५० रेस्टॉरंट करणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:47 AM2022-03-09T10:47:25+5:302022-03-09T10:50:01+5:30

आतापर्यंत अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत.

Russia Ukrain War: After KFC, now McDonalds has also taken a big decision; 850 Russian restaurants to close | Russia Ukrain War: KFCनंतर आता McDonalds कंपनीनेही घेतला मोठा निर्णय; रशियातील ८५० रेस्टॉरंट करणार बंद 

Russia Ukrain War: KFCनंतर आता McDonalds कंपनीनेही घेतला मोठा निर्णय; रशियातील ८५० रेस्टॉरंट करणार बंद 

Next

रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा १४वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशियाने हे युद्ध पुकारल्यापासून जगातील अनेक देशांनी त्यांच्यावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. एवढेच नाही, तर अनेक मोठ-मोठ्या कंपन्याही आता रशिया विरोधात थेट अ‍ॅक्शन घेताना दिसत आहेत.

आतापर्यंत अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत, तर मोठ्या कंपन्याही रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ पावले उचलताना दिसत आहेत. यामध्ये, आता मॅकडोनाल्ड्सने (McDonalds) रशियामधील सर्व ८५० रेस्टॉरंट तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातील ८४ टक्के रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडे आहेत. गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा वाटा ९ टक्के असल्याचे कंपनीने म्हटले. 

KFC-Pizza Hutt नं गुंडाळला व्यवसाय -

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अनेक मोठ-मोठ्या कंपन्याही रशिया विरोधात समोर येताना आणि अ‍ॅक्शन घेताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणजे, आता KFC-Pizza Hutt ने रशियातून आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अनेक कंपन्यांनी रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला आहे.

रशियाच्या समर्थनात समोर आला चीन -

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना, सध्या अनेक देश न्यूट्रल आहेत. मात्र, यातच चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी रशियाचे उघडपणे समर्थन केले आहे. जग रशियावर जे निर्बंध लादत आहे, त्यामुळे सर्वांचेच नुकसान होणार आहे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. याच बरोबर, चर्चेतून समाधान काढावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दोन्ही देश झुकायला तयार नाहीत -

सद्यस्थितीत, रशिया आणि युक्रेन दोहोंपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नाही आणि हल्ल्यांची मालिकाही सुरूच आहे. सुमीमध्ये रशियाने ५०० किलोचा बॉम्ब टाकल्याचा दावाही युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केला आहे. मारियुपोलमध्येही एका मुलाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अशा स्थितीत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. 

Web Title: Russia Ukrain War: After KFC, now McDonalds has also taken a big decision; 850 Russian restaurants to close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.