Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 06:59 PM2022-03-12T18:59:21+5:302022-03-12T19:00:16+5:30

बायडेन म्हणाले, 'रशियन आक्रमणाचा (Russian invasion) सामना करताना युक्रेनच्या नागरिकांनी उल्लेखनीय धाडस आणि शौर्य दाखवले आहे. पण...

Russia Ukrain war American president joe biden sent troops on the Russian border | Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

googlenewsNext

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी लॅटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि रोमानिया यांसारख्या देशांमध्ये रशियाला लागून असलेल्या सीमेवर आपले 12,000 सैनिक पाठवले आहेत. मात्र, आपण युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध (Third World War) लढणार नसल्याचेही त्याने ठामपणे सांगितले आहे. तसेच, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात (Russia Ukraine War)  कधीही विजय मिळणार नाही, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.

इंच-इंच जमिनीचं रक्षण करणार - 
अमेरिका युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध लढणार नाही. मात्र, वॉशिंग्टन नाटोच्या (NATO) कक्षेत येणाऱ्या इंच-इंच जमिनीचे संरक्षण करेल, असे बायडेन यांनी हाऊस डेमोक्रॅटिक कॉकसच्या सदस्यांना संबोधित करताना, स्पष्ट केले. 

मित्रपक्षांसोबत ठामपणे उभे राहणार -
बायडेन म्हणाले, 'रशियन आक्रमणाचा (Russian invasion) सामना करताना युक्रेनच्या नागरिकांनी उल्लेखनीय धाडस आणि शौर्य दाखवले आहे. मात्र, अमेरिकेकडून केले जाणारे संरक्षण सहकार्यही त्यांच्या बचावात महत्वाचे ठरले आहे.' तेसेच, 'ज्या पद्धतीने आम्ही युक्रेनचे समर्थन करत आहोत, त्याच प्रकारे युरोपमधील सहकाऱ्यांसोबतही उभे राहू आणि स्पष्ट संदेश देऊ की, आम्ही एकजूट आहोत आणि नाटोच्या कक्षेत येणाऱ्या इंच-इंच जमिनीचे संरक्षण करू.

नाटो प्रदेशाचे संरक्षण करणार - 
बायडेन म्हणाले, 'यामुळेच आपण 12,000 अमेरिकन सैनिकांना लॅटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि रोमानियासह इतर काही देशांमध्ये रशियाला लागून असलेल्या सीमेवर पाठविले आहे. आपण प्रत्युत्तर दिल्यास तिसरे महायुद्ध निश्चित आहे. 'आपल्यावर नाटो प्रदेशाच्या संरक्षणाची पवित्र जबाबदारी असली तरी, आपण युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध लढणार नाही,' असेही बायडेन यांनी म्हटले आहे.

Web Title: Russia Ukrain war American president joe biden sent troops on the Russian border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.