शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 6:59 PM

बायडेन म्हणाले, 'रशियन आक्रमणाचा (Russian invasion) सामना करताना युक्रेनच्या नागरिकांनी उल्लेखनीय धाडस आणि शौर्य दाखवले आहे. पण...

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी लॅटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि रोमानिया यांसारख्या देशांमध्ये रशियाला लागून असलेल्या सीमेवर आपले 12,000 सैनिक पाठवले आहेत. मात्र, आपण युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध (Third World War) लढणार नसल्याचेही त्याने ठामपणे सांगितले आहे. तसेच, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात (Russia Ukraine War)  कधीही विजय मिळणार नाही, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.

इंच-इंच जमिनीचं रक्षण करणार - अमेरिका युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध लढणार नाही. मात्र, वॉशिंग्टन नाटोच्या (NATO) कक्षेत येणाऱ्या इंच-इंच जमिनीचे संरक्षण करेल, असे बायडेन यांनी हाऊस डेमोक्रॅटिक कॉकसच्या सदस्यांना संबोधित करताना, स्पष्ट केले. 

मित्रपक्षांसोबत ठामपणे उभे राहणार -बायडेन म्हणाले, 'रशियन आक्रमणाचा (Russian invasion) सामना करताना युक्रेनच्या नागरिकांनी उल्लेखनीय धाडस आणि शौर्य दाखवले आहे. मात्र, अमेरिकेकडून केले जाणारे संरक्षण सहकार्यही त्यांच्या बचावात महत्वाचे ठरले आहे.' तेसेच, 'ज्या पद्धतीने आम्ही युक्रेनचे समर्थन करत आहोत, त्याच प्रकारे युरोपमधील सहकाऱ्यांसोबतही उभे राहू आणि स्पष्ट संदेश देऊ की, आम्ही एकजूट आहोत आणि नाटोच्या कक्षेत येणाऱ्या इंच-इंच जमिनीचे संरक्षण करू.

नाटो प्रदेशाचे संरक्षण करणार - बायडेन म्हणाले, 'यामुळेच आपण 12,000 अमेरिकन सैनिकांना लॅटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि रोमानियासह इतर काही देशांमध्ये रशियाला लागून असलेल्या सीमेवर पाठविले आहे. आपण प्रत्युत्तर दिल्यास तिसरे महायुद्ध निश्चित आहे. 'आपल्यावर नाटो प्रदेशाच्या संरक्षणाची पवित्र जबाबदारी असली तरी, आपण युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध लढणार नाही,' असेही बायडेन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाUSअमेरिकाVladimir Putinव्लादिमीर पुतिनJoe Bidenज्यो बायडन