जगभरात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन. युक्रेनसारख्या देशावर हल्लाबोल केल्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून जगभरात या वादळी नावाची चर्चा होत आहे. पुतीन यांच्या प्रत्येक हालचालींवर, विधानांवर आणि निर्णयांवर सध्या जागतिक पातळीतील देशांच्या प्रतिनीधींचे लक्ष्य लागले आहे. त्यातच, पुतीन यांनी त्यांच्या खासगी सेवेतील तब्बल 1000 जणांची बदली केली आहे. कारण, हे लोक आपल्याला जेवणातून विषबाधा करतील, अशी भिती पुतीन यांना वाटत होती.
रशियन सरकारमधील एका सुत्रांच्या हवाल्याने डेली बीस्टच्या रिपोर्टमधून पुतीन यांनी 1000 पर्सनल स्टाफची हकालपट्टी केली आहे. त्यामध्ये, बॉडीगार्ड, कुक, कपडे धुणारे आणि सचिव यांचाही समावेश आहे. सध्या रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातून पुतीन यांच्यावर टीका होत आहे. तसेच, जगभरातील अनेक संस्था, कंपन्या आणि काही देशांकडून रशिया आणि पुतीन यांच्यावर निर्बंधही लादण्यात येत आहेत.
युक्रेन, अमेरिकेसह पाश्चिमात्य देशातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सातत्याने रशियन सैन्याचा सीमारेषेवर वाढत असलेल्या घटनांबाबत माहिती दिली होती. युक्रेनवर हल्ला करण्याचाच हेतू रशियाचा आहे. मात्र, क्रेमलिनने युक्रेनवरील हल्ल्याचा उद्देश नसल्याचे म्हटले होते. मात्र, 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. अमेरिकेच्या साऊथ कोरोलिनाचे खासदार लिंडसे ग्राहम यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्यात येणार असल्याचे विधान केले आहे. ग्राहम यांनी महिन्याच्या सुरूवातीलाच व्लादिमीर पुतीन यांची एडॉल्फ हिटलरशी तुलना केली होती. ह्या युद्धाला संपविण्याचा एकमात्र उपाय म्हणजे पुतीन यांना संपवून टाकणे, असे ग्राहम यांनी म्हटले होते.
विषबाधा होण्यासाटी क्रेमलिन प्रसिद्ध
क्रेमलीनमधूनच पुतीन यांनां सपविण्याचं काम होऊ शकतं. इतर देशाच्या कुठल्याही सरकारद्वारे ते शक्य नाही. रशियाची गुप्तचर यंत्रणा हाच एकमेव पर्याय आहे, जो लोकांची हत्या करण्यासाठी त्यांना विष पाजतो. विष देण्याच्या घटनेला सर्वप्रथम क्रेमलिन (रशिया राष्ट्रपती कार्यालय) सोबत जोडण्यात आले. क्रेमलिनच्या टिकाकारांना नर्व एजंट नोवोचिक देण्यात येते होते. पुतीन यांचे सर्वात मोठे टिकाकार एलेक्सी नवालनी यांस 2020 मध्ये नोवोचिक देण्यात आले होते. मात्र, तात्काळ उपचार मिळाल्याने ते वाचू शकले. सध्या ते रशियातील एका तुरुंगात कैद आहेत.