Russia-Ukrain War: पोलंडमध्ये जाऊन बायडेन यांनी दिले रशियाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:22 AM2022-03-27T11:22:13+5:302022-03-27T11:22:55+5:30

युक्रेन निर्वासितांच्या स्थितीची घेतली माहिती

Russia-Ukrain War: Going to Poland, Biden challenged Russia putin | Russia-Ukrain War: पोलंडमध्ये जाऊन बायडेन यांनी दिले रशियाला आव्हान

Russia-Ukrain War: पोलंडमध्ये जाऊन बायडेन यांनी दिले रशियाला आव्हान

Next

रेजजो : युक्रेन सीमेपासून ८० कि.मी. दूर असलेल्या पोलंडमधील रेजजो या शहरामध्ये तैनात असलेल्या अमेरिकेसह नाटो देशांच्या सैनिकांशी तिथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संवाद साधला. या दौऱ्यातून बायडेन यांनी रशियाला आव्हान दिले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युद्ध गुन्हेगार असल्याची टीका त्यांनी केली. रेजजोतील नाटो सैनिकांना बायडेन यांनी पिझ्झा पार्टी दिली व त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.
पोलंडमध्ये असलेल्या नाटो देशांच्या सैनिकांचे मनोधैर्य उंचावणे व रशियावरील दबाव वाढविणे हा बायडेन यांच्या पोलंडभेटीचा हेतू होता. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकेच्या एखाद्या राष्ट्राध्यक्षाने युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या इतक्या जवळ जाऊन सैनिकांशी संवाद साधला. 

‘पुतीन हे युद्ध गुन्हेगार’
रेजजो या शहरातील नाटो देशांच्या सैनिकांना बायडेन यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणामुळे युक्रेनमध्ये जाता येत नाही याचे मला वाईट वाटले. युक्रेनवर आक्रमण करून रशियाने मोठी चूक केली आहे. पुतीन हे युद्ध गुन्हेगार आहेत. त्यांनी सुरू केलेल्या युद्धाचे परिणाम युरोप व साऱ्या जगालाच भोगावे लागत आहेत.

तीन शहरांतून रशियन सैनिकांना हुसकावले 
युक्रेनची राजधानी कीव्हच्या नजीक असलेल्या तीन शहरांतून रशियन सैनिकांना हुसकावून ती ठिकाणे युक्रेनच्या लष्कराने पुन्हा ताब्यात घेतली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ही शहरे रशियन लष्कराच्या ताब्यात होती.

Web Title: Russia-Ukrain War: Going to Poland, Biden challenged Russia putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.