शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

Russia-Ukrain War: पोलंडमध्ये जाऊन बायडेन यांनी दिले रशियाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:22 AM

युक्रेन निर्वासितांच्या स्थितीची घेतली माहिती

रेजजो : युक्रेन सीमेपासून ८० कि.मी. दूर असलेल्या पोलंडमधील रेजजो या शहरामध्ये तैनात असलेल्या अमेरिकेसह नाटो देशांच्या सैनिकांशी तिथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संवाद साधला. या दौऱ्यातून बायडेन यांनी रशियाला आव्हान दिले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युद्ध गुन्हेगार असल्याची टीका त्यांनी केली. रेजजोतील नाटो सैनिकांना बायडेन यांनी पिझ्झा पार्टी दिली व त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.पोलंडमध्ये असलेल्या नाटो देशांच्या सैनिकांचे मनोधैर्य उंचावणे व रशियावरील दबाव वाढविणे हा बायडेन यांच्या पोलंडभेटीचा हेतू होता. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकेच्या एखाद्या राष्ट्राध्यक्षाने युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या इतक्या जवळ जाऊन सैनिकांशी संवाद साधला. 

‘पुतीन हे युद्ध गुन्हेगार’रेजजो या शहरातील नाटो देशांच्या सैनिकांना बायडेन यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणामुळे युक्रेनमध्ये जाता येत नाही याचे मला वाईट वाटले. युक्रेनवर आक्रमण करून रशियाने मोठी चूक केली आहे. पुतीन हे युद्ध गुन्हेगार आहेत. त्यांनी सुरू केलेल्या युद्धाचे परिणाम युरोप व साऱ्या जगालाच भोगावे लागत आहेत.

तीन शहरांतून रशियन सैनिकांना हुसकावले युक्रेनची राजधानी कीव्हच्या नजीक असलेल्या तीन शहरांतून रशियन सैनिकांना हुसकावून ती ठिकाणे युक्रेनच्या लष्कराने पुन्हा ताब्यात घेतली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ही शहरे रशियन लष्कराच्या ताब्यात होती.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया