24 Feb, 22 01:29 PM
युक्रेनमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
24 Feb, 22 01:27 PM
युक्रेन संकटावर परराष्ट्र मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक
24 Feb, 22 01:25 PM
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
केंद्र सरकारने युक्रेनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. यासोबतच तिथे अडकलेले नागरिक दिलेल्या वेबसाइटवर मदत मागू शकतात.
24 Feb, 22 01:12 PM
अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षा सतर्कतेची घोषणा
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनमध्ये 'लष्करी कारवाई' घोषित केल्यानंतर अमेरिकन दूतावासाने युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षा सतर्कतेची घोषणा केली. "युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांना त्या ठिकाणी आश्रय घेण्याचा आणि आवश्यक कारवाई करण्याचा सल्ला देण्यात आला आहे."
24 Feb, 22 01:06 PM
युक्रेनमध्ये रणगाडे घुसले, विमानतळावरही हल्ला
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युक्रेनच्या मारियुपोल शहरात रणगाडे दिसले आहेत. याशिवाय. विमानतळाजवळील लष्कराच्या जागेतून धूर निघताना दिसत आहे. इतर शहरांतील विमानतळांवरही हल्ले झाले आहेत.
24 Feb, 22 12:55 PM
रशियाच्या हल्ल्यात 7 ठार तर 9 जण जखमी, युक्रेनची माहिती
24 Feb, 22 12:54 PM
24 Feb, 22 12:43 PM
युक्रेनमध्ये गोळीबार; ब्रोव्हरी, कीव येथे 1 ठार, 1 जखमी
24 Feb, 22 12:26 PM
आजचा दिवस युरोपच्या इतिहासातील काळा दिवस - जर्मनीचे चांसलर
रशियाच्या लष्करी कारवाईवर जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो युरोपच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच वेळी, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की युक्रेन रशियाचा सामना करेल अशी आशा आहे.
24 Feb, 22 12:08 PM
युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांना महत्त्वाची सूचना
कीव, युक्रेन येथील भारताच्या दूतावासाने 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांना महत्त्वाची सूचना जारी केली.
24 Feb, 22 11:59 AM
युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा उद्धवस्त, रशियाचा दावा
रशियन न्यूज एजन्सी TASS नुसार, लष्करी कारवाई दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा उद्धवस्त केली आहे.
24 Feb, 22 11:42 AM
आम्ही रशियाची पाच विमाने पाडली, युक्रेनच्या लष्कराचा दावा
24 Feb, 22 11:38 AM
बर्लिनमधील ब्रँडनबर्ग गेट युक्रेनियन ध्वजाच्या रंगांनी उजळले
रशियासोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान बर्लिनमधील ब्रँडनबर्ग गेट युक्रेनियन ध्वजाच्या रंगांनी उजळले आहे.
24 Feb, 22 11:32 AM
युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू
रशियाने कारवाई केल्यानंतर युक्रेनने मार्शल लॉ लागू केला आहे. मार्शल लॉमध्ये सर्व गोष्टी थेट लष्करी नियंत्रणाखाली जातात.
24 Feb, 22 11:26 AM
कॅनडाकडून कारवाईचा निषेध
कॅनडाने युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध केला आहे. तसेच, सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे.
24 Feb, 22 11:24 AM
182 भारतीयांसह विशेष UIA फ्लाइट्स युक्रेनहून दिल्लीत दाखल
24 Feb, 22 11:15 AM
युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक धमाके, रशियाकडून एअरपोर्ट बंद
24 Feb, 22 11:14 AM
युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम, युद्धामुळे सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
24 Feb, 22 11:12 AM
यूके आणि आमचे सहयोगी निर्णायकपणे प्रतिसाद देतील : यूके पंतप्रधान
24 Feb, 22 11:03 AM
युक्रेनवर रशियाच्या अन्यायकारक हल्ल्याचा तीव्र निषेध - EU आयोगाच्या अध्यक्ष
24 Feb, 22 10:54 AM
एअर इंडियाची फ्लाइट भारताकडे रवाना
एअर इंडियाची फ्लाइट AI1947 ही NOTAM (नोटिस टू एअर मिशन) मुळे, कीव, युक्रेन येथे परत येत आहे.
24 Feb, 22 10:51 AM
युक्रेनमध्ये रशियन सैन्याची हालचाल; अनेक शहरांमध्ये क्षेपणास्त्रे, स्फोट