शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Baba Vanga Prediction: पुतिन संपूर्ण जगावर राज्य करतील, बाबा वँगा यांनी रशियासंदर्भात केली होती अशी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 5:12 PM

बदललेल्या जागतिक परिस्थितीत, आता रशिया जगाचा नवा सम्राट होणार? अमेरिका आणि युरोपचे वर्चस्व संपणार? अशी चर्चा जगभर सुरू आहे. यातच, बाबा वँगा यांच्या भविष्यवाणीचीही चर्चा जोर धरू लागली आहे...

नाटोमध्ये सामील होण्याच्या मुद्द्यावरून रशिया आणि युक्रेन  यांच्यात भयावह युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि नाटो देशांच्या धमक्यांची कसलीही परवा न करता रशियन सैन्याने युक्रेनच्या सर्वच भागांवर हल्ले सुरू केले आहेत. महत्वाचे म्हणजे, या युद्धात संपूर्ण जग रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची दादागिरी पाहत आहे. (Baba Vanga Prediction)

रशिया होणार जगाचा नवा सम्राट...?बदललेल्या जागतिक परिस्थितीत, आता रशिया जगाचा नवा सम्राट होणार? अमेरिका आणि युरोपचे वर्चस्व संपणार? अशी चर्चा जगभर सुरू आहे. तसेच, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असतानाच, बाबा वँगा यांच्या भविष्यवाणीचीही चर्चा जोर धरू लागली आहे. या भविष्यवाणीवर विश्वास ठेवल्यास, युक्रेन युद्धानंतर पुतिन जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनणार आहेत आणि रशिया जगावर राज्य करेल.

रशियाला कुणीही रोखू शकणार नाही - भविष्यात रशिया जगावर राज्य करेल आणि युरोपचे रुपांतर ओसाड जमिनीत होईल, असे बाबा वँगा यांनी म्हटले होते. एवढेच नाही, तर 'सर्व काही बर्फासारखे वितळेल. केवळ एका गोष्टीला कुणी स्पर्षही करू शकणार नाही, ती म्हणजे व्लादिमीर आणि रशियाची शान. रशियाला कुणीही रोखू शकणार नाही.' रशिया आपल्या मार्गातून सर्वांना बाजूला सारेल आणि जगावर राज्य करेल, असेही बाबा वँगा यांनी म्हटले होते."

खरी ठरली आहेत बाबा वँगा यांची 'ही' भाकितं - 'बाल्कनचा नॉस्ट्राडेमस' म्हणून ओळखल्या जाणारा दृष्टीहीन बाबा वँगा यांनी 2022 वर्षासाठी केलेल्या भाकितांनी इंटरनेट जगतात खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी 9/11 चा हल्ला आणि ब्रेक्झिट संकटाची अचूक भविष्यवाणी केली होती. सोव्हिएत युनियनचे विघटन, 2001 मधील 11 सप्टेंबरचा हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि चेरनोबिल आपत्ती संदर्भातील त्यांचे दावे सत्य सिद्ध झाले आहेत.

वयाच्या 12 व्या वर्षीच वँगेलिया पांडव गुस्टेरोवा यांनी आपली दृष्टी गमावली. आपल्याला भविष्याकडे बघण्यासाठी देवाकडून ही एक देणगी मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला होता. 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी मृत्यूपूर्वी त्यांनी 2022 संदर्भात धक्कादायक भविष्यवाणी केली होती. असे म्हटले जाते, की बाबा वेंगा यांनी केलेल्या जवळपास 85 टक्के भविष्यवाण्या सत्य सिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये 5079 पर्यंतचा उल्लेख आढळतो.

 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन