Russia Ukraine Crisis : ...पण भारतीयांचे स्पिरीट जागे होते; धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना परतण्याचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:11 AM2022-02-26T06:11:45+5:302022-02-26T06:12:45+5:30

Russia Ukraine Crisis :मनात धास्तीने घर केले तरी ते डगमगले नाहीत. युक्रेनमधील हे भारतीय विद्यार्थी हिंमतीनं उभे राहिले....‘लोकमत’ने संपर्क साधून त्यांना धीर दिला.

Russia Ukraine Crisis: ... but the spirit of the Indians was awakened; Confidence in the return of distressed students | Russia Ukraine Crisis : ...पण भारतीयांचे स्पिरीट जागे होते; धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना परतण्याचा विश्वास

Russia Ukraine Crisis : ...पण भारतीयांचे स्पिरीट जागे होते; धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना परतण्याचा विश्वास

Next

युद्धाला तोंड फुटले. तोफा धडाडल्या. रॉकेट येऊन हाताभराच्या अंतरावर कोसळले. आसमंत सायरनच्या आवाजाने व्यापला आणि बंकरमध्ये धावणारे तरूण जीव काळजीत पडले, घाबरलेही. पण भारतीय स्पिरीट जागे होते. मनात धास्तीने घर केले तरी ते डगमगले नाहीत. युक्रेनमधील हे भारतीय विद्यार्थी हिंमतीनं उभे राहिले....‘लोकमत’ने संपर्क साधून त्यांना धीर दिला.

लोकमतच्या राज्यभरातील प्रतिनिधींनी युद्धजन्य भाग, बंकरमधील मुलांशी थेट संपर्क साधला. त्यांची ख्याली-खुशाली जाणून घेतली. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून लवकरच आपापल्या घरी परतण्यास सुरुवात होईल. 

विद्यार्थ्यांनी आपबिती सांगितली. पण, विपरित स्थितीलाही ते कसे समर्थपणे तोंड देत आहेत, हे सांगितले. घरी परतण्याची ओढ जाणवली, सुखरूप परतण्याचा विश्वासही त्यांच्या बोलण्यातून जाणवला. आपल्या आई-वडिलांशी बोलतानाही ही मुले त्यांना धीर देताना दिसली.     

व्हिडिओ काॅलद्वारे संवाद
युक्रेनमधील ओडेसा शहरात अडकलेल्या संकेत राघवेंद्र पाठक या गंगाखेड (जि. परभणी) येथील विद्यार्थ्याशी ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून विचारपूस केली आणि धीरही दिला.

राज्यातील १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून ३०० विद्यार्थ्यांशी आमचा संपर्क झालेला आहे. राज्य नियंत्रण कक्ष त्यांच्या संपर्कात असून त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री

प्रत्येकाच्या हातात बंदुका, जिकडे पहावे तिकडे गोळीबार, बॉम्बवर्षावामुळे कानठळ्या बसविणारे आवाज असे चित्र दोन दिवसांपासून अनुभवत आहे. थंडीत मेट्रो स्टेशनमध्ये दोन रात्री काढल्या, आता भारतीय दूतावासात पोहचलो. भारताने तातडीने आमची सुटका करावी. 
यशवंत संतोष चौधरी, नंदूरबार

मी सध्या ओडेसा शहरात राहत आहे. गुरुवारी शहरापासून दहा किमी अंतरावर आर्मी बंकरवर रशियन फौजांनी बॉम्बहल्ला केला. त्यामुळे मनात धस्स झाले होते. भीती वाटत होती; परंतु धीर धरला. आता १० ते १२ दिवसांचे अन्न साठवून ठेवलेले आहे. त्यामुळे जेवणाची चिंता नाही. 
संकेत राघवेंद्र पाठक, गंगाखेड (जि. परभणी)  

आम्ही शेल्टरचा आसरा घेतलाय. सतत बॉम्ब वर्षाव होत असला तरी आपण सुरक्षित आहोत. कोणी मेट्रोच्या स्टेशनचा आसरा घेतलाय तर कुणी कॉलेजच्या हॉस्टेलवर स्वतःला अक्षरश कोंडून घेतले आहे. जीव मुठीत धरून आहोत, पण मनात सुरक्षितपणे मायदेश गाठू, असा विश्वास आहे. 
शिवानी लोणकर, पुणे 

मी चर्नी युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये राहताे. पाच दिवसांपूर्वीच युक्रेनमध्ये पोहोचलाे. दुसऱ्याच दिवशी युद्धाला तोंड फुटले. मात्र, बॉम्बहल्ला झाला ते ठिकाण आपल्या हॉस्टेलपासून ५५० किलोमीटर अंतरावर असल्याने सध्या तरी आम्ही सुरक्षित आहाेत.
संकेत राजेश चव्हाण, दारव्हा (जि. यवतमाळ) 

Web Title: Russia Ukraine Crisis: ... but the spirit of the Indians was awakened; Confidence in the return of distressed students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.