Russia Ukraine Crisis: डाळ-तांदूळ संपलंय, पीठही मिळेना, युक्रेनमधील भारतीयांची दयनीय अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:30 PM2022-02-25T14:30:02+5:302022-02-25T14:42:19+5:30

Russia Ukraine Crisis: युक्रेनमध्ये एअर स्ट्राईक झाल्यानंतर तेथील परिस्थिती विदारक बनत असून जगभरातील देश प्रभावित झाले आहेत.

Russia Ukraine Crisis: Dal-rice ran out, flour was not available, Indians in Ukraine were told the situation | Russia Ukraine Crisis: डाळ-तांदूळ संपलंय, पीठही मिळेना, युक्रेनमधील भारतीयांची दयनीय अवस्था

Russia Ukraine Crisis: डाळ-तांदूळ संपलंय, पीठही मिळेना, युक्रेनमधील भारतीयांची दयनीय अवस्था

Next

युक्रेनच्या राजधानीपासून ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या आमच्या शहरात बुधवारपर्यंत सारे काही सुरळीत होते; पण गुरुवारची पहाट भीतीदायक परिस्थिती घेऊन उगवली. सकाळपासूनच रशियन क्षेपणास्त्रांचे हल्ले आमच्याही शहरांवर सुरू झाले. क्षणोक्षणी परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. सर्वत्र बॉम्बच्या हल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर साचले आहेत. समोरच्या क्षणी काय होईल, या विचाराचा भयकंप प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. कुठूनतरी मदत येईल या अपेक्षेने सर्व भारतीय जीव मुठीत घेऊन एकेक क्षण काढत आहोत. 

युक्रेनमध्ये एअर स्ट्राईक झाल्यानंतर तेथील परिस्थिती विदारक बनत असून जगभरातील देश प्रभावित झाले आहेत. त्याचा फटका भारताताली बसत असून भारतीय अर्थव्यवस्थेवरही काहीसा परिणाम होणार आहे. मात्र, प्राथमिक मुद्दा म्हटल्यास तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे होणार हाल. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांनी सुपरमार्केटमधून डाळ, पीठ अशा गरजेच्या वस्तू खरेदी करुन ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे आम्ही जेव्हा सुपरमार्केटमध्ये पोहोचलो, तेव्हा तेथील सामान संपले होते. त्यामुळे, आम्हाला मॅगी, फळ, ब्रेड आणि जूस हेच विकत घ्यावं लागलं. सध्या खाण्यासाठी जे काही खरेदी केलंय, ते केवळ 2 ते 3 दिवसचं पुरेल एवढं असल्याचं तेथील भारतीय नागरिकांनी म्हटलं.

डाळ-तांदूळ पीठही मिळेना  

उत्तर प्रदेशच्या बिजनौरनिवासी विद्यार्थीनी सना उर्ररहमानने तेथील आपबिती सांगितली. इवानो फ्रेंकविस्क इंटरनेशनल मेडिकल यूनिवर्सिटीत एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. सना म्हणते की, भारतीय परराष्ट्र खात्याकडून सातत्याने युक्रेन देश सोडण्याचे सांगण्यात येत होते. मात्र, महाविद्यालयाकडून ऑनलाईन शिक्षणाला परवानगी देण्यात आली नाही. मात्र, जेव्हा ऑनलाईन शिक्षणास परवानगी मिळाली, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. बुधवारी रात्री रशियाने हल्ला केल्यानंतर गुरुवारी सुपर मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली. त्यामुळे, तेथील गरजेचं सामान लवकरच संपुष्टात आलं. आम्हाला डाळ, तांदूळ किंवा पीठ विकत भेटलंच नाही, असेही सनाने सांगितले. 

नागपूर अन् गोंदियाचेही विद्यार्थी

युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात राहणाऱ्या मूळच्या गोंदिया येथील व सध्या नागपुरात राहणारा पवन मेश्राम या विद्यार्थ्याने तेथील भयावह परिस्थितीचे चित्र मांडले. पवन हा नागपुरातील धरमपेठ येथील रहिवासी असून, तो सध्या युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तो इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरातील नॅशनल मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. दोन वर्षांपूर्वीच तो तिथे गेला. ‘लोकमत’ने संपर्क साधला असता पवनने सांगितले की, रशियाने आतापर्यंत अर्धे युक्रेन ताब्यात घेतले आहे. राजधानी किव्हपासून आमचे शहर ५०० किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील जवळपास १२०० विद्यार्थी येथे सध्या शिक्षण घेत आहेत.

वीज-पाण्याचा तुटवडा

आमचे शहर कालपर्यंत हल्ल्यापासून सुरक्षित होते; परंतु बुधवारी हल्ले झाले. स्ट्रीटवर खूप सारे बंकर तयार करण्यात आले होते. त्याठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. संपूर्ण इव्हानोमध्ये हायड्रोलेटिक पाइप, जिथून विजेचा, पाण्याचा पुरवठा होत होता, त्याचठिकाणी हल्ला केला आहे. गावं आणि शहरांमध्ये वीज, पाणी याचा तुटवडा यावा म्हणून हा हल्ला केला आहे. सगळीकडे आणीबाणी निर्माण झाली आहे. बाहेर सगळीकडे धूर दिसत आहे. एटीएममधून पैसे निघत नाहीत. सर्व विद्यार्थी घाबरलेले आहेत. 

‘विमान तिकीटही महागलं, कसं काढू?’

पवनने सांगितले की, भारतीय दूतावासाने २० तारखेला आम्हाला युक्रेन सोडण्यासंदर्भात सूचना केली. भारतात जाण्यासाठी एअर इंडियाची विमाने २२, २४ आणि २६ तारखेला उपलब्ध करून देण्यात आली. तिकीट प्रत्येकाने आपापले काढायचे आहे. एरव्ही किव्ह ते दिल्ली या प्रवासासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो; परंतु आता ६० ते ८० हजार रुपये आकारले जात आहेत. इतके महाग तिकीट कसे काढणार?  
 

Web Title: Russia Ukraine Crisis: Dal-rice ran out, flour was not available, Indians in Ukraine were told the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.