शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Russia Ukraine Crisis : शेकडो विद्यार्थी मेट्रो स्टेशनमध्ये आश्रयाला; रोमानिया, पोलंडकडे जाण्यात भारतीयांना प्रचंड अडथळे

By योगेश पांडे | Published: February 26, 2022 6:44 AM

राजधानीतदेखील शिरल्या रशियाच्या तोफा

योगेश पांडेयुक्रेनमधील स्थिती आणखी गंभीर झाली असून, तेथे अडकलेल्या हजारो भारतीयांचा जीव टांगणीला लागला आहे. राजधानी कीव्हमध्ये देखील रशियाचे सैन्य शिरले असून, देश सोडून जाण्याच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे. 

दुर्दैवाची बाब म्हणजे खार्कोव्ह किव्हकडे निघालेले शेकडो विद्यार्थी रस्त्यातच अडकले आहेत. त्यातील अनेकांनी चक्क न्यायव्हकी मेट्रो स्थानक व टनेलमध्ये आश्रय घेतला आहे. मूळचे नागपूरकर व मागील १७ वर्षांपासून युक्रेनमध्ये असलेले एअरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर हे ‘लोकमत’च्या संपर्कात असून, प्रत्यक्ष वास्तव सांगत आहेत.

रोमानिया व पोलंडच्या सीमा खुल्या झाल्यामुळे अनेकांनी खासगी वाहनांनी तिकडे जाण्याचे ठरविले. भारतीय दूतावासाने देखील चारशे विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था केली होती. मात्र, मार्गावर युक्रेनकडून आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आलेली नाही. शिवाय राजधानीतून बाहेर पडण्याच्या मार्गांवर गोळीबार व बॉम्बहल्ले सुरू आहेत. त्यामुळे भारतीयांनी आहेत तेथेच थांबावे, अशी सूचना देण्यात आली आहे. 

रात्रभर दहशत, डोळ्यांसमोर रशियाचे रणगाडेकीव्हमध्ये रात्रभर दहशतीचे वातावरण होते व सातत्याने गोळीबार तसेच बॉम्बस्फोटांचे आवाज येत होते. सकाळच्या सुमारास तर कीव्हमध्ये रशियाचे रणगाडे देखील शिरले. खिडकीच्या बाहेर पाहिले असता रशियन सैन्य दिसून येत आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांवर गोळीबार वगैरे केलेला नाही. प्रत्येक जण शक्य त्या पद्धतीने एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे थंडी आणि दुसरीकडे हल्ल्याची भीती अशा दुहेरी संकटात लोक सापडले आहेत.

भारतीय राष्ट्रध्वज लावण्याच्या सूचनास्लोव्हाकिया, हंगेरीने देखील युक्रेनमधून नागरिकांना प्रवेश देण्याची संमती दिली आहे. ज्या भारतीयांना हंगेरीत जायचे आहे, त्यांनी नोंदणी करायची आहे. आम्ही अनेकांची नोंदणी केली आहे. शुक्रवारची रात्र सरली की, स्थिती आणखी स्पष्ट होईल. भारतीय नागरिकांना त्यांच्या वाहनांवर भारतीय झेंडा लावण्याची तातडीची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती मुनेश्वर यांनी दिली.

भारतीयांकडून माणुसकीचे दर्शनभारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची शक्य तेवढी मदत करण्यात येत आहे. खार्कोव्ह येथे अडकलेल्यांपैकी काही विद्यार्थ्यांना तेथील भारतीयांनी राहण्याची जागा दिली.  या विद्यार्थ्यांना व नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर काढणे अत्यावश्यक आहे, अशी भावना मुनेश्वर यांनी व्यक्त केली.

‘पाण्याच्या घोटासाठी झालोय महाग’प्रसाद कानडेपुणे :  दिवस-रात्र आम्ही शेल्टरचा आसरा घेतलाय. वाजणारे सायरन, उरात धडकी भरविणारे बॉम्बहल्ले आणि आजूबाजूला दिसणारा रक्तपात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. सततच्या बॉम्ब वर्षावात आपण सुरक्षित आहोत हिच येथील प्रत्येकाची भावना  आहे. सुरक्षितपणे मायदेश गाठणे हीच इच्छा आहे, असे पुण्याची  शिवानी लोणकर सांगत होती.  तिच्यासारख्या हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडलेत. 

शिवानी किव्हमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. ती म्हणाली,  युक्रेनची परिस्थिती शिवानी सांगतेय. सध्याची स्थिती आणीबाणीची आहे. स्थानिक प्रशासन कोणतीच मदत करीत नाही. सायरन वाजताच शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचना केल्या आहेत. पण शेल्टर मधील परिस्थिती भीषण आहे. पिण्यास देखील पाणी नाही. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतStudentविद्यार्थी