रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को-समर्थित प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देणार्या फरमानांवर स्वाक्षरी केल्यानंतर, काही तासांतच, पूर्व युक्रेनमध्ये, फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील भागात सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आहेत. रशियाचे संरक्षण मंत्री क्रेमलिन यांनी याला शांतता अभियान, असे नाव दिले आहे. मात्र, अमेरिकेसह इतर अनेक देशांनी युक्रेनवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, रशियाचे हे पाऊल म्हणजे, यूक्रेन विरोधात एका मोठ्या सैन्य अभियानाची सुरुवात असू शकते, असा इशारा अमेरिका आणि पश्चिमेकडील अधिकाऱ्यांनी दिला आहे. पुतीन यांनी सोमवारी रात्री एक भाषणात किवच्या पश्चिमेसोबत वाढत असलेल्या सुरक्षा संबंधांवर टीका केली. तसेच, यूएसएसआरचा इतिहास आणि युक्रेनच्या समाजवादी सोव्हिएत प्रजासत्ताकाच्या निर्मितीसंदर्भात भाष्य करताना युक्रेनच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारावर शंका व्यक्त केली. ते देशाच्या पूर्वेकडील भागास "प्राचीन रशियन भूमी" म्हणत म्हणाले, "युक्रेनला स्वतःच्या राज्याची परंपरा कधीच नव्हती."
पुतीन यांनी दिली संरक्षणाची हमी -पुतीन यांच्या आदेशाने पूर्व यूक्रेनमधील डोनबास भागातील डोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक आणि लुगांस्कला पीपल्स रिपब्लिक (DPR, LPR) या दोन प्रदेशांबाबत मॉस्कोच्या अधिकृत मान्यतेसंदर्भात अवगत केले. त्यांना फरमानांमध्ये स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली आणि रशियन सैन्यासह त्यांच्या सुरक्षेची हमी दिली. तसेच, रशियाचे तथाकथित शांतता सेन्य या प्रदेशांत तैनात केली जातील, असे फरमानात म्हणण्यात आले आहे.
पुतीन यांच्या भाषणावर अमेरिकेचा निशाणा - यासंदर्भात, अमेरिकन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की पुतीन यांचे भाषण रशियन जनतेसाठी युद्ध कसे बरोबर, हे सिद्ध करण्यासाठी होते. हा सार्वभौम आणि स्वतंत्र युक्रेनच्या विचारांवर हल्ला आहे. एवढेच नाही, तर आणखी एक रशियन आक्रमण आणि कब्जाची मानवी किंमत विनाशकारी ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.