शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Russia-Ukraine War Crisis : रशियाचा युक्रेनवर हल्ला? डोनेत्स्कमध्ये 5 स्फोट, UNSCची आपत्कालीन बैठक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 8:48 AM

रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्‍यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे.

रशिया आणि युक्रेन आता युद्धाच्या अगदी जवळ पोहोचल्याचे दिसत आहे. फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क शहरात गुरुवारी पहाटे किमान पाच स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यानंतर लष्कराचे चार ट्रक घटनास्थळी रवाना झाले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, संभाव्य रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने आपली काही विमानतळे बंद केली आहेत.

रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्‍यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली आपत्कालीन बैठक - एएफपी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीन दिवसांत दुसऱ्यांदा आपत्कालीन सत्र बोलावले आहे. यात युक्रेन संकटावर चर्चा होणार आहे. सीमेवर रशियन सैन्याची तैनाती सुरू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, कीवच्या विनंतीवरून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. लष्कराचे दोन ताफे डोनेत्स्कच्या दिशेने गेल्याचा दावा -दोन रशियन लष्करी ताफे बुधवारी पूर्व युक्रेनच्या अशांत डोनेत्स्कडे जात असल्याचा दावा करण्यात आला होता. एवढेच नाही, तर बुधवारी काही प्रसारमाध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने, आधुनिक लष्करी सामग्रीसह सज्ज असलेले दोन ताफे डोनेत्स्कच्या दिशेने वेगाने जात आहेत, असे म्हटले होते. मात्र, या ताफ्यांमधील लष्करी वाहनांवर कोणत्याही देशाचे चिन्ह नाही, असा दावाही प्रत्यक्षदर्शिंनी केला आहे.

रशियाने नुकतेच पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क आणि डोनेत्स्क भागांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे आणि तेथे आपले सैन्य पाठविण्याचे आदेशही दिले आहेत. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धrussiaरशिया