Russia Ukraine War: युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार; रशियन माध्यमाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 07:58 PM2022-02-27T19:58:19+5:302022-02-27T19:59:03+5:30

युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली असल्याचा मोठा दावा रशियाच्या स्टेट मीडियाने केला आहे.

Russia ukraine crisis Russia ukraine war Ukraine agrees to hold talks with russia in belarus says russian state media | Russia Ukraine War: युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार; रशियन माध्यमाचा दावा

Russia Ukraine War: युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार; रशियन माध्यमाचा दावा

googlenewsNext

युद्धभूमी बनलेल्या युक्रेनची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यातच युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युद्ध आणि तणावाच्या परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.

युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली असल्याचा मोठा दावा रशियाच्या स्टेट मीडियाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून, युक्रेनचे एक शिष्टमंडळ चर्चेसाठी बेलारूसला रवाना झाले आहे.

यापूर्वी "आम्ही रशियासोबत चर्चेसाठी तयार आहोत. पण बेलारूसमध्ये चर्चा करण्याची आमची तयारी नाही. वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट, इस्तंबूल, बाकू यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस तयार आहोत", असे झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटल्याचे वृत्त आले होते.

युक्रेननं ठोठावला ICJ चा दरवाजा -
यातच, युक्रेनने रशियाविरोधात मोठे पाऊल उचलत थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचाच दरवाजाही ठोठावला आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी ट्विट करत, युक्रेनने रशिया विरोधात आयसीजेकडे अर्ज केल्याचे म्हटले आहे. "रशियाला आक्रामकतेच्या समर्थनासाठी, नरसंहारासंदर्भात जबाबदार धरायला हवे. आता रशियाला सैन्य कारवाई थांबवण्यासंदर्भात तातडीने आदेश देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी आम्ही विनंती करतो. तसेच पुढील आठवड्यात ट्रायलला सुरुवात होईल, अशी आशा करतो. अशा आशयाचे ट्विट झेलेन्स्की यांनी केले आहे.

Web Title: Russia ukraine crisis Russia ukraine war Ukraine agrees to hold talks with russia in belarus says russian state media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.