Russia Ukraine Crisis: युक्रेन-रशिया युद्धादरम्यान रशियाने अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेकच्या प्रवासावर बंदी घातली आहे. अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध लादून आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत असताना रशियाने हे पाऊल उचलले आहे. अमेरिका युक्रेनला सतत मदत करत असून रशियाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे देत असल्याने रशियानेही या लोकांवर बंदी घातली आहे. रशियाने ज्या लोकांवर बंदी घातली आहे त्यात अमेरिकन आणि कॅनडियन वंशाच्या जवळपास 90 लोकांची नावे आहेत. दोन्ही देशांचे संरक्षण अधिकारी, व्यावसायिक नेते आणि पत्रकारांचाही या यादीत समावेश आहे. रशियाने गुरुवारी बंदी जाहीर केलीगुरुवारी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, रशियाने 29 अमेरिकन आणि 61 कॅनेडियन नागरिकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. ही बंदी अनिश्चित काळासाठी लागू राहणार असल्याचेही मंत्रालयामार्फत सांगण्यात आले आहे. निर्बंधांमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह एबीसी न्यूज टेलिव्हिजन प्रेझेंटर जॉर्ज स्टेफनोपॉलोस, वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक डेव्हिड इग्नेशियस आणि रशिया-केंद्रित मेडुझा न्यूज साइटचे संपादक केविन रोथ्रॉक यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी आणि उप संरक्षण सचिव कॅथलीन हिक्स यांचेही या यादीत नाव आहे.
अमेरिकेची युक्रेनला मदतरशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत अमेरिकेने अनेकदा युक्रेनला आर्थिक मदत आणि शस्त्रे पुरवली आहेत. रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठीच अमेरिका युक्रेनला मदत करत आहे. दुसरीकडे, रशियाने कॅनडाच्या कॅमेरून अहमद, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि कॅनेडियन स्पेशल ऑपरेशन्स फोर्स कमांडर स्टीव्ह बोईविन यांच्यावरही बंदी घातली आहे. कॅनडाही युक्रेनला मदत करत असल्याचा रशियाचा आरोप आहे.