पॅरिस:रशिया (Russia) आणि युक्रेन(Ukraine)मधील तणावाकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या दोन देशातील तणाव कमी करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. फ्रान्स(France) चे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emanuel Macron) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. रविवारी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत इमारतीकडून (एलिसी पॅलेस) एक निवेदन जारी करण्यात आले, त्यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन(Joe Biden) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी भेटण्यास सहमती दर्शविली आहे.
या अटीवर ठरली बैठकइमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रस्तावित केलेल्या शिखर परिषदेला जो बायडेन आणि क्वादिमीर पुतिन यांनी सहमती दर्शवल्याचे निवेदनात म्हटले आहे. आपल्या प्रस्तावात मॅक्रॉन यांनी युरोपमधील सुरक्षा आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्याबाबत बोलले आहे. या बैठकीत दोन्ही देशांचे अध्यक्ष येण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, रशियाने युक्रेनवर हल्ला न करण्याच्या अटीवरच ही बैठक होईल, असेही फ्रान्सने या निवेदनात म्हटले आहे.
रशियाने हल्ला न करण्याचे आश्वासन दिलेइमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी युक्रेनमधील परिस्थितीबाबत पुतीन आणि बायडेन यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधला होता. पुतिन यांनी मॅक्रॉनला आश्वासन दिले की ते युक्रेनवर हल्ला करणार नाहीत. पण, रशिया युक्रेनवर केव्हाही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेकडून व्यक्त करण्यात येत होती. पण, आता या बैठकीत या परिस्थितीवर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.
लवकरच मसुदा तयार केला जाईलबायडेन आणि पुतिन दोघांनीही या शिखर परिषदेसाठी सहमती दर्शवली असून, या शिखर परिषदेच्या तयारीसाठी 24 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांची बैठक होत आहे. यादरम्यान शिखर परिषदेचा मसुदा तयार केला जाईल. रशियाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन युक्रेन संकटावरील शिखर परिषदेदरम्यान चर्चेचे विषय तयार करण्यासाठी सर्व पक्षांसोबत काम करतील.