मॉस्को: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा केवळ अमेरिका किंवा पाश्चात्य देशांमध्येच विरोध होत आहे असे नाही. तर खुद्द राष्ट्रापती व्लादिमीर पुतीन यांच्या या निर्णयाचा त्यांच्या देशात, म्हणजेच रशियातही विरोध होत आहे. काही जण युक्रेनला दान देण्याचा विचार करत आहेत, तर कुणी पुतिन यांच्या नाकाखाली, त्यांच्याच सैनिकांना त्यांच्याच टँक्सखाली चिरडण्याचे ट्रेनिंग देत आहेत. हो, आपण अगदी बोरबर वाचले. आम्ही आपल्याला अशाच एका रशियन टँक गुरूसंदर्भात सांगणार आहोत. जी सोशल मीडियावर युक्रेन (Ukraine)च्या लोकांना रशियन टँक (Russian Tank) चलविण्याची पद्धत सांगत आहे.
रशियन नागरिक, युक्रेनसोबत -युक्रेनमध्ये तैनात असलेल्या रशियन सैनिकांकडील इंधन संपत असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर येत आहेत. रशियन सैनिक आपले टँक आणि एपीसी युक्रेनमध्येच सोडत आहेत. असे असतानाच Nastya Tyman चा व्हिडिओही समोर आला आहे. यामुळे तिच्याकडे युक्रेनची सपोर्टर म्हणून पाहिले जात आहे.
पेशानं मॅकेनिक आहे Nastya Tyman -द स्कॉटिश सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, ही तरुणी मुळची रशियन आहे. मात्र, या युद्धात युक्रेनला सपोर्ट करत आहे. रशियाची सोशल मीडिया सेंसेशन Nastya Tyman युक्रेनच्या रस्त्यावर बेवारस पडलेले रशियन आर्म्ड पर्सनल कॅरियर (Russian Armored Personnel Carrier) म्हणजेच APC टँक्स चालवण्याचे ट्रेनिंग लोकांना देत आहे. तिने तिचा एक वर्षांपूर्वीचा व्हिडिओ Instagram वर पोस्ट करत, 'आपल्याला एखादा रशियन टंक रस्त्यावर उभा दिसला, तर तो कसा चालवायचा, हे मी आपल्याला सांगते,' असे लिहिले आहे. असे लिहिले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, Nastya Tyman टँकमध्ये प्रवेश करते. मग एक एक करून तो चालवण्याची पद्धत सांगते. खरे तर, Nastya Tyman स्वतः एक कार मेकॅनिक आहे. ती युट्यूबवरही प्रसिद्ध आहे. आता या परिस्थितीत तिच्याकडे युक्रेनची सपोर्टर म्हणून पाहिले जात आहे. कारण ती रशियाची नागरिक असली तरी तिचा जन्म युक्रेनमध्ये झाला आहे.
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा सर्वाधिक विरोध राजधानी मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये होत आहे. येथील शोकडो लोक युक्रेनच्या बाजूने दिसत आहेत. Tyman चा व्हिडिओकडेही याच दृष्टीने पाहिले जात आहे.