युक्रेनच्या सीमेवर रशियाने सैन्याची कुमक वाढविल्याची बातमी ताजी असतानाच आता मोठी बातमी येत आहे. गेल्या २४ तासांपासून युक्रेनवर तोफगोळे आणि गोळीबाराचा वर्षाव सुरु झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. गुरुवारी रशिया समर्थित फुटीरतावाद्यांनी हे तोफगोळे डागल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. हा गोळीबार रशिया हल्ला करणार अशी शक्यता असताना करण्यात आला होता.
दुसरीकडे रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. सीमारेषेवरील एका गावावर हे तोफगोळे डागण्यात आले आहेत. एका किंडरगार्टनवर हे तोफगोळे पडले. न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता आहे. याचवेळी फुटीरतावादी गटाने युक्रेन गोंधळात पडावा आणि रशियावर हल्ला सुरु करावा, या मनसुब्याने हा हल्ला केल्याची शक्यात वर्तविली आहे. रशियाने दोन दिवसांपूर्वी सैन्य मागे घेत असल्याचे सांगत सीमेवर सात हजार सैन्य वाढविल्याचे सॅटेलाईट इमेजमध्ये समजले आहे. प्रत्यक्षात हे सैन्य माघारी जात नव्हते तर युक्रेनच्या दिशेने सर्वाधिक जवळचा रस्त्यावरून कूच करत होते.
फुटीरतावाद्यांनी गेल्या 24 तासांत युक्रेनच्या हद्दीत चार वेळा गोळीबार केला. तर युक्रेनने बंडखोरांवर गोळीबार केला असआ आरोप युक्रेनवरही करण्यात आला आहे. बंडखोरांनी बालवाडीवर हल्ला केल्याचे युक्रेनच्या वतीने सांगण्यात आले. रॉयटर्सच्या छायाचित्रकाराने लुहान्स्क प्रदेशातील युक्रेनियन बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या कादिव्का शहराच्या दिशेने गोळीबार झाल्याचे ऐकले. लुहांस्क पीपुल्स रिपब्लिक या विद्रोही संघटनेने सांगितले की, युक्रेनने हल्ल्यामध्ये मोर्टार, ग्रेनेड लाँचर आणि मशीनगनचा वापर केला.
युक्रेनच्या सशस्त्र दलांनी मोठी शस्त्रे वापरून युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे, जे मिन्स्क करारानुसार मागे घेणे आवश्यक आहे, असा आरोप फुटीरतावाद्यांनी केला. तर लुहान्स्क प्रदेशातील स्टानित्सा लुगांस्क या गावावर फुटीरतावाद्यांनी गोळीबार केला. अतिरेक्यांनी जड तोफखान्याचा वापर केला., असा आरोप युक्रेनच्या सैन्याने केला आहे.