शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

७ भारतीय तरूण रशियात अडकले; बळजबरीने उतरवले युद्धात, बचावासाठी केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 12:42 PM

russia ukraine war news: रशियात गेलेल्या पंजाब आणि हरयाणातील सात तरूणांसोबत धक्कादायक प्रकार घडला.

Russia Ukraine News: नववर्षाच्या स्वागतासाठी परदेशात गेलेल्या पंजाब आणि हरयाणातील सात तरूणांसोबत धक्कादायक प्रकार घडला. त्यांनी व्हिडीओ शेअर करत भारत सरकारकडे मदतीचं आवाहन केलं आहे. रशियामध्ये फिरायला गेले असता तिथं त्यांना जबरदस्तीनं लष्करी सेवेत काम करावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच रशिया आणि युक्रेन युद्धासाठी आमचा बळजबरीनं वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये हे तरुण एका बंद खोलीत असल्याचे दिसतात. 

गगनदीप सिंग (२४), लवप्रीत सिंग (२४), नारायण सिंग (२२), गुरप्रीत सिंग (२१), गुरप्रीत सिंग (२३), हर्ष कुमार (२०) आणि अभिषेक कुमार (२१) अशी या तरुणांची नावं आहेत. ते पंजाब आणि हरयाणा येथील रहिवासी आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, ते एका बंद खोलीत लष्करी जवानांचं जॅकेट आणि डोक्यावर टोपी परिधान केलेल्या अवस्थेत आहेत.

हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २० वर्षीय हर्षने त्यांची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं भारत सरकारकडं मदतीसाठी आवाहन केलं आहे. हर्षच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्ष साजरं करण्यासाठी तो मित्रांसह २७ डिसेंबरला ९० दिवसांचा व्हिसा घेऊन रशियाला गेला होता. त्यांना तिथं एका एजंटने फसवलं, ज्यानं त्यांना बेलारूसला नेण्याचं आश्वासन दिलं, परंतु व्हिसाच्या आवश्यकतेबद्दल त्यांना काहीच माहिती दिली नाही. ते बेलारूसला पोहोचल्यावर एजंटनं आणखी काही पैसे मागितले. त्याला त्यांनी पैसे देखील दिले. मात्र तो पैसे घेऊन त्यांना तिथेच सोडून गेला. त्यानंतर तेथील पोलिसांनी सात जणांना पकडून रशियन लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं.

बचावासाठी केली विनंती व्हिडीओच्या माध्यमातून हर्षने आरोप केला आहे की, त्याला काही कागदपत्रांवर सही करण्यास भाग पाडले गेले. आता त्यांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यास भाग पाडले जात आहे. हर्षला परदेशात जाऊन नोकरी करायची होती, असा खुलासा हर्षच्या कुटुंबीयांनी केला. खरं तर त्याला एजंटकडून सांगण्यात आले की, रशियातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणे सोपे होईल. तर हर्षचा सहकारी असलेल्या गुरप्रीत सिंगचा भाऊ अमृत सिंगने सांगितले की, त्यांनी स्वाक्षरी केलेली कागदपत्रे रशियन भाषेत असल्याने त्यांना काही समजले नाही. मग त्यांना बेलारूसमध्ये लष्करी सेवेत बळजबरीने तैनात करण्यात आले. त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास किंवा रशियन सैन्यात सामील होण्याचा पर्याय देण्यात आला होता.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाPunjabपंजाबHaryanaहरयाणाIndiaभारत