Russia-Ukraiane War: 'थेट सीमेवर जाऊ नका'; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सरकारचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:05 PM2022-02-28T19:05:32+5:302022-02-28T19:05:41+5:30

Russia-Ukraiane War: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 1396 विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे.

Russia | Ukraine | Russia-Ukraine war | 'Don't go straight to the Ukraine border'; Government directs Indians stranded in Ukraine | Russia-Ukraiane War: 'थेट सीमेवर जाऊ नका'; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सरकारचे निर्देश

Russia-Ukraiane War: 'थेट सीमेवर जाऊ नका'; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सरकारचे निर्देश

Next

कीव: रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये अडकलेले बहुतेक लोक विद्यार्थी आहेत. भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार विशेष विमान पाठवत आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने आज युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी निर्देश जारी केले आहेत. "भारतीय विद्यार्थ्यी आणि इतर नागरिकांनी देशाच्या पश्चिम भागाकडे जाण्याचा प्रयत्न करावा, थेट सीमेवर पोहोचू नये," असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

शेकडो भारतीय मादेशात परतले
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ''युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, रोमानिया आणि मोल्दोव्हा या शेजारील देशांमध्ये अधिकाऱ्यांशी समन्वय साधूनच सीमा ओलांडण्यासाठी जावे.'' रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिल्या अॅडव्हायझरीनंतर 8,000 हून अधिक भारतीयांनी युक्रेन सोडल्याचा अंदाज आहे. बागची यांनी सांगितल्यानुसार, ऑपरेशन गंगा अंतर्गत 6 फ्लाइट्सद्वारे आतापर्यंत 1,396 विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे.

फक्त युक्रेनची सीमा ओलांडावी
बागची म्हणाले की, पुढील 24 तासांत आणखी तीन उड्डाणे पाठवण्याची योजना आहे. त्यापैकी दोन उड्डाणे बुखारेस्टहून दिल्ली आणि मुंबईसाठी तर एक उड्डाण बुडापेस्टहून दिल्लीसाठी असेल. परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विमानांच्या उपलब्धतेबद्दल घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे. बागची म्हणाले की, "उड्डाणे मर्यादित नाहीत, काळजी करण्याची गरज नाही. भारतीयांनी फक्त युक्रेनची सीमा सुरक्षितपणे ओलांडली पाहिजे, ही आमची मुख्य चिंता आहे."

लवकरात लवकर पश्चिमेकडे जावे
बागची पुढे म्हणाले की, युक्रेनची राजधानी कीवमधून कर्फ्यू हटवण्यात आला आहे. त्यानंतर आता लोकांना जाण्याची परवानगी मिळाली आहे. भारतीयांनी लवकरात लवकर कीव रेल्वे स्थानकावर जावे आणि तेथून पश्चिम सीमेकडे जाण्यासाठी पकडावी. युक्रेन सरकारने कीव येथून मोफत ट्रेन सेवा सुरू केली आहे.

Web Title: Russia | Ukraine | Russia-Ukraine war | 'Don't go straight to the Ukraine border'; Government directs Indians stranded in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.