मॉस्को: युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशिया आता युरोपवर वर्चस्व गाजवण्याची योजना आखत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फिनलंड आणि स्वीडनला धमकी दिली आहे. युक्रेनमध्ये रशियाची आक्रमकता जसजशी तीव्र होत चालली आहे, त्याचप्रमाणे रशिया इतर देशांवर आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. आता रशियाचे व्लादिमीर पुतीन यांनी स्वीडन आणि फिनलँडला धमकी दिली आहे की, जर ते नाटोमध्ये सामील झाले तर त्याचे अत्यंत भयानक परिणाम भोगावे लागतील.
द मिररमधील वृत्तानुसार, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणतात की, ''नाटोमध्ये सामील झाल्यानंतर रशियाच्या शेजारील देशांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. फिनलंड आणि स्वीडन नाटोमध्ये सामील झाल्यास याचे गंभीर लष्करी आणि राजकीय परिणाम भोगावे लागली." रशियाचे युक्रेनवरील आक्रमण तीव्र होत असताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हा इशारा दिला आहे. या दोन्ही देशांची रशियाशी सीमा आहे. यावरुन आता रशिया हळुहळू वर्चस्व वाढवताना दिसत आहे.
युद्धाचा आज चौथा दिवस आहेरशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीववर हल्ला केला आहे. कीवमध्ये स्फोट आणि गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या. युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिका, ब्रिटनसह 28 देश पुढे आले आहेत. याशिवाय जर्मनीने युक्रेनला एक हजार रणगाडाविरोधी आणि 500 जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे देण्याचा निर्णय घेतला आहे.
झेलेन्स्कींनी मोदींशी संवाद साधलारशिया आणि युक्रेनच्या युद्धात अद्याप भारताने कुठलीही आक्रमक भूमिका घेतलेली नाही. रशिया आणि अमेरिका भारताचे मित्र राष्ट्र असल्यामुळे भारत एका बाजूने निर्णय घेऊ शकत नाही. दरम्यान, काल म्हणजेच युद्धाच्यातिसऱ्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.