Russia Ukraine War: "मी कुणालाही घाबरत नाही", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जारी केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 09:13 AM2022-03-08T09:13:58+5:302022-03-08T09:14:35+5:30

Ukraine Russia War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की युक्रेनमधून पळून गेल्याचे रशियन प्रसारमाध्यमांकडून सातत्याने बोलले जात असताना, त्यांनी व्हिडिओ जारी करुन युक्रेनमध्येच असल्याचे सांगितले आहे.

Russia | Ukraine | Russia-Ukraine War | President volodymyr zelensky releases video, claims he in in Ukraine | Russia Ukraine War: "मी कुणालाही घाबरत नाही", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जारी केला व्हिडिओ

Russia Ukraine War: "मी कुणालाही घाबरत नाही", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जारी केला व्हिडिओ

googlenewsNext

कीव:युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा (Russia-Ukraine War) आज 13वा दिवस आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की (volodymyr zelensky) देश सोडून पळून गेल्याचे काही वृत्त समोर आले होते, पण आता वोलोडिमीर जेलेन्स्कींनी कीवमध्ये असल्याचा दावा करणारा व्हिडिओ जारी केला आहे. ''मी कोणाला घाबरत नाही'', असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

"मी घाबरत नाही..."
आपल्या व्हिडिओत जेलेन्स्की म्हणतात- ''मी कुठेही पळून गेले नाही आणि लपलोही नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मी लपवत नाही. युद्ध जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.'' जेलेन्स्की युक्रेनमधून पळून गेल्याचे रशियन प्रसारमाध्यमांकडून सातत्याने बोलले जात असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हिडिओ जारी करुन युक्रेनमध्येच असल्याचे सांगितले आहे.

युद्धबंदीनंतरही रशियाचे हल्ले सुरूच आहेत
रशियाने नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सोमवारी सकाळपासून युद्धविरामासह अनेक भागात मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली. पण, कॉरिडॉरच्या घोषणेनंतरही, रशियन सैन्याने काही युक्रेनियन शहरांवर रॉकेट हल्ले आणि काही भागात भीषण लढाई सुरुच ठेवली. उत्तर, दक्षिण आणि मध्य युक्रेनमधील शहरांमध्ये रशियाने गोळीबार सुरू ठेवल्याने हजारो युक्रेनियन सुरक्षितपणे पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

निर्वासितांची संख्या 17 लाखांच्या पुढे
युद्धातील मृतांचा आकडा स्पष्ट झालेला नाही. खार्किव प्रदेश पोलिसांनी सोमवारी सांगितले की, तिथे 209 लोकांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी 133 सामान्य नागरिक होते. यूएन निर्वासित एजन्सी म्हणते की, युद्धग्रस्त युक्रेन सोडून आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. इतर अनेक शहरांमध्ये गोळीबारात अडकले आहेत. 

Web Title: Russia | Ukraine | Russia-Ukraine War | President volodymyr zelensky releases video, claims he in in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.