कीव: मागील सहा दिवसांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. नुकताच रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवमधील एका सरकारी इमारतीला उडवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता रशियाने कीपमधील आणखी एका सरकारी संपत्तीचे नुकसान केले आहे.
टीव्ही टॉवर उडवलेरशियन सैन्याने राजधानी कीवमधील मुख्य टीव्ही टॉवरला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे अनेक टीव्ही चॅनेल्सच्या प्रक्षेपणावर परिणाम झाला आहे. युक्रेनच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. रशियाने युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खारकीवलाही लक्ष्य केले आहे. रशियाने निवासी भागांवर हल्ले केल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. त्या हल्ल्यांमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचाही मृत्यू झालाय.
रशियाचे सैन्य अनके शहरांत घुसलेरशियन सैन्य आपले टँक आणि इतर लष्करी वाहने घेऊन युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये घुसले आहेत. आज सकाळी रशियन रणगाड्यांनी खारकीव आणि राजधानी कीव दरम्यान वसलेल्या ओक्टिर्का शहराच्या लष्करी तळावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 70 हून अधिक युक्रेनचे सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय, युद्धामुळे सहा लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. लाखो लोकांनी जीव वाचवण्यासाठी भूमिगत मेट्रो स्टेशन, बंकर आणि इतर आश्रयस्थानांचा आसरा घेतला आहे.