Russia Ukraine War: शौर्याला सलाम! युक्रेनच्या व्यक्तीने एकट्याने केला रशियन टँकचा सामना, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 04:44 PM2022-02-27T16:44:06+5:302022-02-27T16:45:00+5:30
Russia Ukraine Conflict: रशियाने युक्रेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या खार्कीववर ताबा मिळवला आहे.
कीव: मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक ठिकाणांवर ताबा मिळवला असून, मोठ्या प्रमाणात विध्वंस सुरू आहे. ज्या ठिकाणी युक्रेनचे सैन्य नाही, तिथे स्थानिक नागरिक रशियन सैन्याचा सामना करताना दिसत आहेत.
तो एकटा टँकसमोर उभा राहतो
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये युक्रेनचा एक नागरिक त्याच्या हाताने रशियन सैन्याचा टँक थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रथम तो माणूस रशियन सैन्याच्या टाकीवर चढतो, नंतर खाली उडी मारतो आणि त्याच्या हातांनी टँकला मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो.
Ukrainian civilians slow down the Russian advance by climbing on top of enemy tanks trying to pass through the city of Bakhmach in the Chernihiv region.
— Visegrád 24 (@visegrad24) February 26, 2022
The bravery of the Ukrainian people is unparalleled.
🇺🇦
pic.twitter.com/iG16BFzj2t
युक्रेनियन नागरिकांचा निःशस्त्र सामना
भल्यामोठ्या टँकला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण एकटा माणूस टँकला थांबवू शकत नाही. शेवटी तो टँकसमोर गुडघे टेकून बसतो. यानंतर काही लोक तिथे जमा होतात. हा व्हिडिओ उत्तर युक्रेनमधील बाखमाचमधील असल्याची माहिती मिळत आहे. त्या ठिकाणी युक्रेनचे नागरिक नि:शस्त्र रशियन सैनिकांसमोर उभे राहून विरोध करत आहेत.
युक्रेनच्या मोठ्या शहरावर रशियाचा ताबा
दरम्यान, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियन सैन्याने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किवमध्ये प्रवेश केला आहे. खार्किव प्रादेशिक प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिनेहुबोव्ह यांनी रविवारी सांगितले की, युक्रेनियन सैन्याने शहरात रशियन सैन्याशी लढा दिला. तसेच, नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिला. खार्किव हे रशियन सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे.