कीव: मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक ठिकाणांवर ताबा मिळवला असून, मोठ्या प्रमाणात विध्वंस सुरू आहे. ज्या ठिकाणी युक्रेनचे सैन्य नाही, तिथे स्थानिक नागरिक रशियन सैन्याचा सामना करताना दिसत आहेत.
तो एकटा टँकसमोर उभा राहतोअसाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये युक्रेनचा एक नागरिक त्याच्या हाताने रशियन सैन्याचा टँक थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रथम तो माणूस रशियन सैन्याच्या टाकीवर चढतो, नंतर खाली उडी मारतो आणि त्याच्या हातांनी टँकला मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो.
युक्रेनियन नागरिकांचा निःशस्त्र सामनाभल्यामोठ्या टँकला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण एकटा माणूस टँकला थांबवू शकत नाही. शेवटी तो टँकसमोर गुडघे टेकून बसतो. यानंतर काही लोक तिथे जमा होतात. हा व्हिडिओ उत्तर युक्रेनमधील बाखमाचमधील असल्याची माहिती मिळत आहे. त्या ठिकाणी युक्रेनचे नागरिक नि:शस्त्र रशियन सैनिकांसमोर उभे राहून विरोध करत आहेत.
युक्रेनच्या मोठ्या शहरावर रशियाचा ताबादरम्यान, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियन सैन्याने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किवमध्ये प्रवेश केला आहे. खार्किव प्रादेशिक प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिनेहुबोव्ह यांनी रविवारी सांगितले की, युक्रेनियन सैन्याने शहरात रशियन सैन्याशी लढा दिला. तसेच, नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिला. खार्किव हे रशियन सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे.